केळापूर तालुक्यात अती पावसामुळे पिकांचे नुकसान, बळीराजा चिंतेत


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (१७ ऑक्टो.) : निसर्गाच्या प्रकोपामुळे अति पावसामुळे शेतकऱ्यांचे अथोनाथ नुकसान झाले. वर्षभर शेतात राबून ऐन पीक काढणीच्या वेळी शेतकऱ्यांच्या हाती अजून पीक आले नाही. अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सोयाबीन,कापूस,अशा नगदी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेल दिसून येत आहे. ऐन दिवाळी तोंडावर येत आहे अजून शेतकऱ्यांच्या हाती अजून काही लागले नाही. यंदा दिवाळी ही अंधारातच करावी लागणार आहे अशी स्थिती दिसून येत आहे. अतीपावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत घट झालेल दिसून देत आहे. तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे अतिवृष्टी जाहीर करावी जेनेकरून बळीराज्याला दिलासा मिळेल.
                     
हंगामात सोयाबीन व कापूस काढणीसाठी मजुरांचा तुटवडा निर्माण होत आहे. शेतकऱ्यांना मजुरांसाठी जिकडेतिकडे धावपड करावी लागत आहे. शेतात काम करण्यासाठी बाहेरगावचे लेबर आणावे लागत आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खर्च वाढलेलं दिसून येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळाला पाहिजे जेणेकरून लावलेला खर्च निघाला पाहिजे. अतिपावसामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे.
                  
प्रशासनच मायबाप समजून शेतकऱ्यांना तालुक्यात अतिवृष्टी जाहीर करण्याची मागणी शेतकरी करत आहे. दिवाळी सन आला प्रशासन लवकरात लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी.
केळापूर तालुक्यात अती पावसामुळे पिकांचे नुकसान, बळीराजा चिंतेत केळापूर तालुक्यात अती पावसामुळे पिकांचे नुकसान, बळीराजा चिंतेत Reviewed by सह्याद्री चौफेर on October 17, 2021 Rating: 5
Powered by Blogger.