मारेगाव पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार राजेश पुरी यांचे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून दिल्या शुभेच्छा

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (१७ ऑक्टो) : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सचिनभाऊ काकडे यांच्या उपस्थित संघटनेचे मारेगाव तालुका अध्यक्ष अनंतराव गोवर्धन यांच्या हस्ते नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार राजेश पुरी यांना पुष्प गुच्छ देवून शुभेच्छा दिल्या.

यावेळी तालुका सहसचिव सुदर्शन टेकाम, पंकज नेहारे (सिंहझेप), सचिन मेश्राम (मारेगाव वार्ता), अमोल कुमरे (बाळकडू), पत्रकार रोहन आदेवार (दखल न्यूज), पत्रकार आनंद नक्षिणे (लोकवाणी), पत्रकार सुमित गेडाम, पत्रकार सुरेश पाचभाई, पत्रकार विवेक तोडासे (सह्याद्री न्यूज), राजू दावे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

या छोटेखानी स्वागत प्रसंगी ठाणेदार पुरी यांनी सर्वांचे आभार मानले व नेहमीच आपले सहकार्य मिळो हीच अपेक्षा आहे. असे मत व्यक्त केले. त्यानंतर सर्वांनी आपापला परिचय करून दिला. 
मारेगाव पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार राजेश पुरी यांचे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून दिल्या शुभेच्छा मारेगाव पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार राजेश पुरी यांचे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून दिल्या शुभेच्छा Reviewed by सह्याद्री चौफेर on October 17, 2021 Rating: 5
Powered by Blogger.