सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (१७ ऑक्टो.) : तालुक्यातील बडुर येथुन दिवसा ढवळ्या या परिसरात देशी दारू पार्सल होत आहे. येथील एका राजकीय पुढाऱ्यांनी दारू दुकान लावले आणि सर्व बडुर परिसरातील जनतेला मात्र, चांगलेच पावले. परंतु पोलिस प्रशासन व उत्पादन शुल्क यांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले असून, बडुर येथील दारू दुकान सकाळी चालू करण्याची 05 वा. तर बंद करण्याची वेळ संध्याकाळी 11 वाजता आहे.
गावांतील एका युवकाने ग्रामपंचायतीकडे अहवाल मागितले होते. त्यांनाही अहवाल देण्यास नाकारले आणि यात असे की, बडुर येथील नागरिकांनी व्यसन मुक्तीचे संघटन राबवीत आहेत मात्र, व्यसन मुक्तीच्या वाटेवर जाणाऱ्यांना देशी दारूच्या भट्टी वर नेत आहेत. ही गंभीर बाब असल्याची नागरिकांतून ओरड आहे.
बडुर परिसरातील हिंगनी, दर्यापूर, बामनी, मिनकी, मूतन्याल, पोखर्णी या ठिकाणी अवैध देशी दारूचे वाहतुक चक्क! दुचाकी च्या सहाय्याने होत आहे. मात्र, पोलिस प्रशासन व उत्पादन शुल्क जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहे अशी चर्चा परिसरातील नागरिकांतून होत आहे.
येथील दारूचा व्यवसाय जोमात पोलिस प्रशासन व उत्पादन शुल्क कोमात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 17, 2021
Rating:
