विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्याची उत्तम संधी


सह्याद्री न्यूज | सुनील शिरपुरे
झरी, (०१ आक्टो.) : प्रत्येक शिक्षण संस्थेला चालू शैक्षणिक सत्रातील पटसंख्या पूर्ण करणे गरजेचं असते. त्यासाठी रिक्त जागा भरून काढावेच लागते. त्या अनुषंगाने बेलोरा स्थित जवाहर नवोदय विद्यालयात नववीतील रिक्त जागा भरून काढण्यासाठी आवेदन पत्र मागविण्यात आले आहे. त्यामुळे आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ही उत्तम संधी मिळाली आहे. तरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा. 
          
हे ऑनलाईन आवेेदन पत्र आपणास 31 ऑक्टोबर पर्यंत भरता येईल. त्यानंतर 9 एप्रिल 2022 रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. या परीक्षेत बाजी मारणा-या विद्यार्थांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळणार आहे. आपणास माहितच आहे की, जवाहर नवोदय विद्यालय ही नावाजलेली शिक्षणसंस्था आहे. या संस्थेत सहजासहजी प्रवेश मिळत नाही. त्यामुळे ही संधी आपल्याकडे चालून आलेली आहे. तर ही संधी हातातून निसटता कामा नये.
          
या शिक्षण संस्थेतून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी उच्च पदावर आरुढ झालेले आहे. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचायला हवी. जेणेकरून आपल्याकडून काही विद्यार्थ्यांचं भविष्य घडविल्या जाईल. आपल्या या अप्रत्यक्ष कृतीतून अनेक विद्यार्थ्यांचं जीवनमान उंचावल्या जाईल. त्यामुळे नवोदय विद्यालयाचे प्राचार्य के.डी. धोपटे यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आवेदन पत्र भरण्याचे आवाहन केले आहे.
विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्याची उत्तम संधी विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्याची उत्तम संधी Reviewed by सह्याद्री चौफेर on October 01, 2021 Rating: 5
Powered by Blogger.