वारंवार खंडीत होणाऱ्या विज पुरवठ्यामुळे वाढू लागला जनतेचा संताप


सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०१ आक्टो.) : विज वितरण कंपनीचा बेजबाबदारपणा आता नागरिकांच्या रोषाचे कारण बनू लागला आहे. ग्राहकांना संतुष्ट ठेवण्यात विज वितरण कंपनी कमी पडू लागली आहे. विज वितरण कंपनीचा कारभार पूर्णता ढेपाळल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. विज वितरण कंपनीकडून करण्यात येणार्या विज पुरवठ्यामुळे ग्राहक जराही समाधानी नाहीत. वेळोवेळी खंडीत होणारा विज पुरवठा नागरिकांची डोकेदुखी ठरू लागला आहे. विज वितरणने मान्सूनपुर्वीची कोणतीही कामे पुर्ण न केल्याने नेहमी विज प्रवाह बंद चालू होत असतो. विद्युत तारांना स्पर्श करणारी झाडे कापण्यात न आल्याने थोडीही हवा आली की, विज तारांचे एकमेकांना घर्शण होऊन नेहमी विज पुरवठा खंडीत होतो. त्यामूळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळेलाही तासंतास विज गोल असते. कधी कधी तर काही कारण नसतांनाही विजेचा लपंडाव सुरु असतो. या नेहमी खंडीत होणाऱ्या विज प्रवाहामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहे. 

ग्रामीण भागत तर विजप्रवाह कधी खंडीत होईल याची शास्वतीच राहिलेली नाही. पाण्या पावसाच्या दिवसांमध्ये रात्रीलाही लाईन तासनतास बंद रहात असल्याने ग्रामीण जनतेला भितिच्या सवटात रात्र काढावी लागते. विषारी जिवांचा ग्रामीण भागत नेहमी संचार असतो. रात्री अनेकदा लाईन गोल रहात असल्याने हे जिवजन्य दृष्टीस पडत नाही, त्यामूळे जनतेच्या जिवाला धोका संभऊ शकतो. याची विज वितरण जराही जाणीव ठेवायला तयार नाही. नेहमी विज पुरवठा खंडीत होण्याने उपचाराधीन रुग्ण व आजरी व्यक्तींनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विज पुरवठा विभागाचा अजब कारभार पहायला मिळत आहे. पथदिवे दिवसालाही सुरु ठेवले जातात. तर घरगुती विज रात्री बंद केली जाते. विज वितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांचा मनस्ताप वाढू लागला आहे. विजेचा खेळ खंडोबा असाच सुरु राहिल्यास विज वितरण कंपनीला जनतेच्या रोषाला समोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

राजुरवासी तर वारंवार खंडीत होणाऱ्या  वीजपुरवठ्यामुळे कमालीचे वैतागले आहेत. विज पुरवठा कधी खंडीत होईल व नंतर विज कधी परत येईल याचा नेमच राहिला नसल्याची राजुरवासीयांची खंत आहे. विज वितरणने मान्सूनपुर्वीची कामे तर केलीच नाही. पण सुरक्षिततेच्या उपाययोजनाही केल्या नाही. ग्रामीण भागातील विज खांबा वरील डीपी सताळ उघडया पडल्या आहेत. डीपीची दरवाजे तुटून पडल्याने रोहित्र खुली रहात असून, कुणी कुचिंदी केल्यास किंवा अन्य कोणत्याही कारणाने शॉर्ट सर्किट होऊन रोहित्र जळाल्यास आसपासच्या दुकानांना व घरांना धोका निर्माण होऊ शकतो. रोहित्र जळल्याने लागलेल्या आगीच्या झळा अजुनही राजुर वासियांमध्ये धुमसत आहे. याची पुनरावृत्ती होणार नाही, ही काळजी विज विभागाला घ्यावी लागणार आहे. वारंवार विज पुरवठा खंडीत होत असल्याने विजेच्या उपकरनांवर आधारित व्यवसायावरही त्याचा चांगलाच परिणाम होत आहे. विज तासंतास बंद रहात असल्याने विजेच्या उपकरणांवर आधारित सर्व कामे ठप्प पडत असल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. विज वितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे व्यवसायिकांसह संपुर्ण जनताच त्रस्त झाली आहे. विज पुरवठा सुरळीत करण्याकडे वेळीच विज वितरणने लक्ष न दिल्यास नागरिकांचा संताप अनावर होऊन त्याचे पडसाद उमटल्या शिवाय राहणार नाही. नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाल्यास त्याचे परिणाम विज वितरणला भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वारंवार खंडीत होणाऱ्या विज पुरवठ्यामुळे वाढू लागला जनतेचा संताप वारंवार खंडीत होणाऱ्या विज पुरवठ्यामुळे वाढू लागला जनतेचा संताप Reviewed by सह्याद्री चौफेर on October 01, 2021 Rating: 5
Powered by Blogger.