श्री.बा.दे.पारवेकर महाविद्यालयात पंडित विष्णू नारायण भातखंडे यांची पुण्यतिथी साजरी


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (०१ आक्टो.) : श्री.बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय, पांढरकवडा येथे दिनांक २३/०९/२०२१ रोजी सांस्कृतिक व IQAC विभागातर्फे पंडित विष्णूशास्त्री भातखंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीत मैफिलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर ए जलतारे उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे संगीत विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक सरोदे सर. बाल गायिका कुमारी श्रुती सरोदे ही उपस्थित होती. तसेच तबला वादक म्हणून अथर्व सरोदे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर ए जलतारे यांनी कार्यक्रमाची भूमिका आणि प्रास्ताविक स्पष्ट करून तसेच विष्णुशास्त्री भातखंडे यांच्या जीवनावर प्रकाश टाकून आपले मनोगत पूर्ण केले या संगीतमय मैफिलीचा श्रीगणेशा बाल गायिका कु.श्रुती सरोदे हिने गणेश वंदनेच्या मधुर गायनातून केली. सदर कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जलतारे सर, प्रा.मानेकर मॅडम, प्रा.सरोदे सर यांनी आपल्या मधुर आवाजात भावगीत व सिनेमा गीत सादर केले.

या मैफिलीच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत तसेच भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी सिनेमाच्या गायनाच्या माध्यमातून पंडित विष्णू नारायण भातखंडे यांना आदरांजली देण्यात आली. सदर कार्यक्रम फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाचे प्रा.नितीन टेकाम यांनी केले. तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. संदीप सत्तुरवार यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्रा.रेळे सर, प्रा.वांढरे सर, प्रा. ढाले सर, प्रा.डॉ.सोरे सर, प्रा.कनाके सर, प्रा.गव्हाणे सर, प्रा.मानेकर मॅडम, प्रा.खंडारे सर, डॉ. चौधरी मॅडम, प्रा.महाजन मॅडम महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री. सुनील महल्ले, श्री. आनंद, श्री. सतीश पवार, श्री.श्रीराम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
श्री.बा.दे.पारवेकर महाविद्यालयात पंडित विष्णू नारायण भातखंडे यांची पुण्यतिथी साजरी श्री.बा.दे.पारवेकर महाविद्यालयात पंडित विष्णू नारायण भातखंडे यांची पुण्यतिथी साजरी Reviewed by सह्याद्री चौफेर on October 01, 2021 Rating: 5
Powered by Blogger.