सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी, (१६ ऑक्टो.) : "स्मृतिशेष वृक्षस्मरण सांत्वन दिंडितंर्गत-"थोडसं जगणं समाजासाठी" या उपक्रमांतर्गत पुरड व नेरड येथे मातृत्वानी दिवंगत सौभाग्यास वाहिली साश्रूनयनांनी भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नऊ माता-भगिणींना साडीचोळी,वृक्ष व ग्रंथभेटीतुन पुंडलिक भक्तीअर्पण केली. अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे वणी , नरड पूरड चे सर्व कार्यकर्ते समस्त गावकरी मंडळी यांच्या सहकार्यातुन साप्ताहिक "वृक्षदिंडी" उपक्रम संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत पुरड गावातील कोविडमृत स्व.उत्तम दुबे, स्व.हरि नक्षणे, स्व.मधुकर मोहितकर, स्व.जगन्नाथ ढेंगळे, स्व.सुरेश ऊईके, व स्व.तुळसा आवारी, तसेच नेरड गावातील कोविड मृत स्व. गजानन थेटे व स्व. मारोती आमणे या दिवंगतांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्या कुटूंबातील महिला प्रमुखांना दिंडीतर्फे साडीचोळी, वृक्ष व संतवाङमय भेट देवुन सांत्वन करण्यात आले.
याप्रसंगी पुरड ग्रा.पं.च्या सरपंचा सिमा आवारी यांनी सेवामंडळातर्फे राबवित असलेल्या वृक्षदिंडीचे कौतुक व वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाज जागृतीची चळवळ जी सेवामंडळा कडून राबविल्या जात आहे. सर्वांनी सर्वांसाठी झटावे, सर्वांच्या हितात स्वहित पाहावे, थोरांनी याचे धडे दाखवावे, आचरोनी निश्चयाने..! हि ग्रामउन्नतीची विचारधारा आपल्या मनोगतातुन व्यक्त केली. तसेच महादेव ताजने यांनी सेवामंडळाच्या या उपक्रमास भरीव सहकार्य दिले.
या कार्यक्रमाच्या निमित्याने धर्माचे व समाज कल्याणाचे कार्य करणार्या कांता कोंकमवार व सुधाकर कोकमवार या दाम्पत्याचा वृक्षदिंडीतर्फे शाल श्रीफळ व साडीचोळी देवुन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी नेरड ग्रा.पं.च्या सरपंचा सुवर्णा जुनगरी,उपसरपंच संतोष कुचनकर, अनिल आमणे यांनी आपल्या मनोगतातुन सेवामंडळाचे धन्यवाद मानले. या दोनही गावात नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.तसेच शेलु (बु), बाबापुर व मानकी येथील सेवामंडळाची प्रचारक मंडळीही प्रामुख्याने हजर होती. श्रीगुरूदेव उपक्रमाचे सुत्रसंचालन राजू भोंगळे यांनी तर पुरड येथे आभार सौरभ बोढे यांनी व नेरड येथे रवि बोंडे यांनी मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या जुनगरी व गुणवंत पचारे यांनी केले. स्वागतगीत साक्षी बोंडे या शाळकरी मुलीने गायले. याठिकाणी सांत्वन समारंभ सुरू असतांनाच गावातील अनिता कोकमवार यांनी इहलोकीची यात्रा संपवून निजधामास गेल्याची वार्ता कळताच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहुन शोकसंवेदना व्यक्त केल्या हे विशेष आहे. यावेळी झिंगुजी पिंपळशेंडे, रुपाली पचारे, विद्या जुनगरी, लता थेरे, मनोहर झाडे, किशोर भांदककर, विठ्ठल माटे यांनी सहकार्य केले.
पुरड नेरड येथे "स्मृतिशेष वृक्षस्मरण सांत्वन भेट" सोहळा संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 16, 2021
Rating:
