सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापुर, (ऑक्टो.) : दि.१४.१०.२०२१ गुरुवार
रोजी,प्रगती दुर्गोउत्सव मंडळ खैरगांव (देशमुख) येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. मंडळाचे मार्गदर्शक स्व किसन शिवनवार सर यांचे अचानक दुःखद निधन झाले तसेच स्व अक्षय देशट्टीवार यांचे अवग्या वयाच्या 27 व्या वर्षी अत्यंत दुखद अपघाती निधन झाले. ते एक मंडळाचे आधारस्थब होते यांच्या स्मृती पितर्थ मंडळाच्या मुलांनी रक्तदान करण्याचे ठरवले आणि एका लहानच्या गावामधून एकूण 61 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्याबद्दल श्री. वसंतराव नाईक शासकिय वैदकिय महाविद्यालय रुग्णालय यवतमाळ रक्तपेढी विभागातर्फे BTO- डॉ.सोनाली नवघरे SSS- श्री मोबिन डुंगे TECH- श्री अनिल राठोड श्री मोहन तळवेकर, श्री दिलीप केराम श्री.संजय नेमाडे हे उपस्थित होते. तसेच खैरगाव दे प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ तायडे साहेब यांचे सुद्धा सहकार्य मिळाले, त्याच प्रकारे सर्व गावकरी मंडळी याचे सहकार्य मिळाले इतक्या छोट्या गावात मिळालेल्या प्रतिसादा बद्दल सर्वांनी अभिनंदन केले.
प्रगती दुर्गा उत्सव मंडळ खैरगाव तर्फे रक्तदान शिबिर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 16, 2021
Rating:
