न. प. द्वारा तयार करण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका केंद्रावर लोकार्पण सोहळा संपन्न
सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (१६ ऑक्टो.) : पांढरकवडा नगरपरिषदेने दिनांक 15 ऑक्टोंबर या भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (माजी राष्ट्रपती) यांच्या जयंती व वाचन प्रेरणा दिवस तसेच जागतिक विद्यार्थी दिन व जागतिक अंध दिनाचे औचित्य साधून 15 ऑक्टोंबर 2021 रोजी या शुभ दिनी सकाळी अकरा वाजता मा.सुरेश कव्हळे तहसीलदार यांच्या हस्ते उद्घाटन करून विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी अभ्यासिकेचे लोकार्पण केले.
टी.एम.पी.योजनेतून आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा यांचेकडून सदर अभ्यासिका निर्मितीसाठी रुपये 37 लक्ष एवढा निधी नगर परिषदेला वितरित करण्यात आला होता, त्या निधीतून सदर अभ्यासिकेची नगरपरिषदेने उभारणी करून शहरातील गोरगरीब होतकरू मध्यमवर्गीय अशा बहुजनाचे शैक्षणिक भविष्य उज्वल होण्यासाठी आय.ए.एम. एम.पीं एस.सी. अशा विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन व्हावे व या आदिवासी बहुल क्षेत्रातून अधिकाधिक विद्यार्थी शासन सेवेत रुजू होऊन या भागाचा नाव लौकिक व्हावा व मुलांनी यांचे भविष्य उज्वल करावे यासाठी न.प.ने मोठा पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ही अभ्यासिका तयार केली आहे.
सदर अभ्यासिका निर्मितीसाठी या नगरीच्या नगराध्यक्ष मा सौ वैशाली अभिनव नहाते यांच्यासह न.प. चे सर्व सभापती नगरसेवक एवढेच नव्हे तर विरोधी सदस्यांनी देखील जिद्द कायम ठेवून सर्वांचे या शहरवासीयांचे स्वप्न साकार केले तसेच न.प.चे मुख्यअधिकारी राजू मोट्टेमवार यांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन सदर काम पूर्णत्वाम केले. यासाठी स्थापत्य अभियंता स्नेहल बोंमकटीवार, अधीक्षक विनोद अंबाडकर, विकास आकुलवार, आरोग्य निरीक्षक संतोष व्यास, संगणक अभियंता वैभव इंगोले, शि.पृ.अ. अतुल वानखडे आदींनी पूर्ण सहकार्य करून योजना पूर्णत्वास नेली सदर लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे व सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी केळापूर विवेक जाॅन्सस यांच्या हस्ते होणार होते. परंतु काही अपरिहार्य कारणात्सव ते उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे केळापूर चे मा.तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी उद्घाटन केले, प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन म्हणून केशरभाई चहाल स्मृती प्रतिष्ठान चे अध्यक्ष डाॅ.अजितसिंह चहाल यांनी उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अभ्यासिकेचे महत्त्व पटवून दिले. तसेच याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून न.प.चे उपाध्यक्ष सरफराजोद्दिन काजी, सौ.मीना बुरांडे शिक्षण सभापती, नगरसेवक रहीम शरीफ युसुफ शरीफ उर्फ माजिदभाऊ त्याचप्रमाणे विरोधी गटनेते बंटीभाऊ जुवारे, सौ रिताताई कनोजे आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे न.प.चे सर्व अधिकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद विद्यार्थी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंगुंरवार यांनी करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक चे मुख्याधिकारी राजु मोट्टेमवार यांनी केले व प्रमुख पाहुणे यांनी अभ्यासिकेचे भाषणात शहर विकासाच्या दृष्टीने हे चांगले पाऊल उचलण्यात आल्याचे सांगून या अभ्यासिकेच्या पूर्णत्वास सर्वांची एकी दाखवून जी साथ दिली त्यासाठी सर्वांना धन्यवाद दिले. शेवटी कार्यक्रमाचे उत्तरार्धात अतुल वानखडे शि.प्र.अधिकरी यांनी आभार प्रदर्शन करून सर्व उपस्थितांचे आभार मानले.
न. प. द्वारा तयार करण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका केंद्रावर लोकार्पण सोहळा संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 16, 2021
Rating:
