अवकाळी पाऊस विजांच्या कडकडाटासह बरसला

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
झरी, (१६ ऑक्टो.) : पाऊस आता नको! असतांना एका आठवड्याच्या विश्रांती नंतर काल रात्री तालुक्यात पुन्हा पावसाचे दमदार आगमन झाले. सप्टेंबर महिन्यात सतत पडणारा पाऊस पिकास हाणीकार ठरला. या पावसाने कापसाचे सुवातीला लागलेली बोंडे मोठ्या प्रमाणात सडली व काढणीस आलेल्या सोयाबीन चे नुकसान झाले मोठ्या प्रमाणात जमीन चिबाडली,    पिकं पिवळे आली, कापूस, तूर व भाजपाला पिकांची वाढ थांबून फूल गळ व फळ गळती झाली.  तेव्हाच नाकी नऊ आले असतांना हा आठ दिवसाची विश्रांती घेवून शुक्रवारी रात्री १ वाजे पासून पुन्हा तालुक्यात मेघर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळायला सुरुवात झाली. आज सकाळी पर्यंत हा अवकाळी पाऊस पडला आहे. आणखी ३ वाजेनंतर पाऊस चालू झाला.
या पावसाने ७० टक्के ते ८० टक्के वेचणीला आलेला कापूस लोबंकाडून खाली गळायला लागलेला दिसत आहे. चिंब भिजलेला कापूस कोंब येवून खराब होण्याची शक्यता आहे.

यावर्षी चांगला कापूस भरपूर पिकेल अशी स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. सोयाबिन काढली थांबली असून, कापून ठेवलेले सोयाबीनचे ढीग ओले गच्च झाले. सोयाबीन व कूटार भिजले. हात तोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण मेहनत वाया गेली असून बियाणे, खते व औषधांचा खर्च ही शाश्वती राहिली नाही. शेतीसाठी काढलेले पिककर्ज, कृषी केंद्राचे उधारी, सावकाराचे कर्ज, हात उसणे देणं कसे फेडावे? मुलांच शिक्षण कुटुंबाचा बारा महिन्याचा खर्च कसा करावा हा प्रश्न उभा ठाकला आहे.
निसर्गाचा लहरीपणा चा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, तो आर्थिक संकटात सापडला असून, कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. गेल्या दोन - तीन वर्षात जंगली जनावरांचा उपद्रव, नैसर्गिक व सुलतानी संकटाने तालुक्यातील शेतकरी पिंजला गेला आहे. पण मात्र, सरकारकडून कोणतीही मदत  मिळताना दिसत नाही.
 
अवकाळी पाऊस विजांच्या कडकडाटासह बरसला अवकाळी पाऊस विजांच्या कडकडाटासह बरसला Reviewed by सह्याद्री चौफेर on October 16, 2021 Rating: 5
Powered by Blogger.