टेंभी ते हिवरा रोडवरील कासारबेहळ नजीक चा पूल झाला जिवघेणा

 
सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (५ ऑक्टो.) : माहागाव तालुक्यातील टेंभी ते हिवरा रोडवरील कासारबेहळ नजीकचा पुल हा जीवघेणा ठरत असून हिमायतनगर - ढाणकीसह यवतमाळ-नागपूर व माहुर गढ येथे जाण्यासाठी शॉर्टकट मार्ग आहे व माहुर देवदर्शनासाठी मराठवाड्यातील बरेच लोक याच मार्गाने येत आसतात.  आज तर मानव विकासची  बस दोन तास पुलावरून पाणी असलेल्यामुळे थांबली होती, त्यामुळे मुलींच्या पालकांना आपल्या मुली घरी येई पर्यंत काळजी पडत असते. मात्र, या पुलावर ही काय पहिलीच वेळ नाय? बऱ्याचदा पुलावरून पाणी वाहत असले की, वाहतूक ठप्प पडते. पण या गंभीर विषयाकडे लोक प्रतिनिधी च तिळ सुद्धा लक्ष नाही. त्यामुळे पालकात संतापाची लाट दिसून येतेय. येणाऱ्या जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीत या पुलाच्या विषयावर ऊतर दयावे  लागतील. अशी चर्चा होत आहे. टेंभी येथील सरपंच तथा महागांव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोल चिकने, अनंतवाडी सरपंच श्रीराम कवाने, कासारबेहळ येथील सरपंच सुलोचना राठोड व उपसरपंच विष्णु जाधव, वरोडी सरपंच गायत्री शिंदे, यांच्या उपस्थितीत वरील मागणीची दखल न घेतल्यास लवकरच सार्वजनिक बांधकाम विभाग येथे आम्ही सर्व सरपंच संघटना घेऊन उपोषणाला बसणार असे, महागांव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोल चिकने यांनी आमच्या प्रतिनिधीला बोलतांना सांगितले. स्वातंत्र्यापासुन या रोडवर साधा पुल झाला होता व मा. आमदार विजयराव खडसे यांच्या कार्यकाळात या पुलावर थातुर मातुर बेड टाकण्यात आला होते पण, तेव्हापासुन या पुलाकडे लोकप्रतिनिधी प्रशासनाचे लक्षच नाही. हे ऐक बांधकाम विभागाचे दुदैव आहे. नुकतेच उदाहरण बघता, उमरखेड नजीक च्या पुलावरून नागपूर डेपो ची बस पुराच्या पाण्यात अंदाज न लागल्यामुळे सदर बस वाहून गेली. त्यात चालक वाहक यासाह चौघाना आपला जीव गमवावा लागला. त्याचीच पुनरावृत्ती टेंभी ते हिवरा रोडवरील कासारबेहळ पूलावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधीनी या विषयाकडे लक्ष घालावे अशी मागणी सरपंच संघटनेनी केली आहे.
टेंभी ते हिवरा रोडवरील कासारबेहळ नजीक चा पूल झाला जिवघेणा टेंभी ते हिवरा रोडवरील कासारबेहळ नजीक चा पूल झाला जिवघेणा Reviewed by सह्याद्री चौफेर on October 05, 2021 Rating: 5
Powered by Blogger.