सह्याद्री न्यूज | किरण घाटे
वणी, (१५ ऑक्टो.) : महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी 'शुर्पणखा 'बसवू नका. अन्यथा प्रत्येक वेळी सरकारचे नाक कापले जाईल असे वक्तव्य चित्राताई वाघ यांनी केले असून त्यांनी गुंगीचे औषध घेतले आहे का ते सांगावे किंवा आधी आपले डोके ठिकाणावर आहे का ते सांगावे.एका मोठ्या पक्षाच्या जबाबदार नेत्यांनी असे वक्तव्य करणे हा उपहास आणि उपमर्द सुध्दा आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून रावणदहन बंद करण्यात यावे यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी निवेदने देण्यात येतात. महात्मा रावण आदिवासी होता की कोण होते हे महत्त्वाचे नाही तर समाजात श्रध्दास्थानी आहेत. हे जर चित्राताई वाघ जाणले पाहिजे होते. रावण अत्यंत शूर होता, चारित्र्य संपन्न विद्वान, पंडित, प्रजाहित दक्ष राजा होता. रावणाची लंका सोन्याची होती. सीतेचे अपहरण करून तिला सन्मानपूर्वक अशोक वनात ठेवले असे वाचनात आले आहे. रावणाने कोणत्या स्त्रीचे वाईट केले? किंवा स्त्रीची बेअब्रू केली बलात्कार केला, शोषण केले, रावण स्त्रीलंपट होता का हे चित्राताईने सांगावे.आणि शुर्पणखाचा कोणता गुन्हा होता ती रावणाला कशाची मदत करत होती. आदिवासी समाजाला हे सविस्तर सांगितले पाहिजे.तसेच कोणालाही किती काळ जाळत रहावे? किती क्रूरता आहे? जाळणे म्हणजे विध्वंस आहे. हा विध्वंस चित्राताई च्या आपल्या मुखातून पडला. या वक्तव्याचा त्रिवार निषेध निषेध निषेध
कुसुम ताई अलाम गडचिरोली जेष्ठ साहित्यिक तथा आदिवासी सेवक 9421728489
महात्मा रावणाचा उपमर्द करणाऱ्या चित्राताई वाघ यांचा जाहीर निषेध
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 15, 2021
Rating:
