कोंबड बाजारावर डीबी पथकाची धाड, चार आरोपी अटकेत तर एक फरार

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (२८ ऑक्टो.) : डीबी पथकाने गुन्हेगारी क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केले असून धाड सत्र व सततच्या कारवायांनी अवैध धंदेवाईकांच्या उरात धडकी भरवली आहे. मटका जुगार व क्रिकेट सट्ट्यावरील धाडीने अवैध धंदे करणाऱ्यांची तंतरली असतांनाच जनावरांची तस्करी व कोंबड बाजारावर धाडी टाकून अवैध धंद्यात गुंतलेल्यांची काही खैर नसल्याचा डीबी पथकाने एकप्रकारे इशाराच दिला आहे. डीबी पथक अलर्ट मोडवर असून काल २८ ऑक्टोबरला खडबडा मोहल्ला येथील कोंबड बाजारावर धाड टाकून डीबी पथकाने अवैध धंद्यांविरुद्ध आपले इरादे स्पष्ट केले आहे. ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी वणी पोलिस स्टेशनचा पदभार सांभाळल्यापासून अवैध धंद्यांविरुद्धच्या कार्यवाहीत आणखीच धार आली आहे. खडबडा मोहल्ला रामघाट निकट निर्गूळा नदीजवळील सार्वजनिक ठिकाणी कोंबड बाजार भरविला जात असल्याची गोपनीय माहिती डीबी पथकाला मिळाली. डीबी पथकाने कुणालाही सुगावा न लागू देता अगदी चपळतापूर्वक त्याठिकाणी धाड टाकली. कोंबड्याच्या झुंजीवर पैशाची बाजी खेळणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली, तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी घटना स्थळावरून २ लाख २ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 
शहरातील खडबडा मोहल्ला रामघाट निकट नदीला लागून असलेल्या खुल्या जागेत कोंबड बाजार भरविला जात असल्याची गुप्त माहिती डीबी पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे डीबी पथकाने जराही चुणूक न लागू देता सायंकाळी त्याठिकाणी धाड टाकली. तेथे काही इसम कोंबड्याच्या झुंजीवर पैशाची बाजी खेळतांना आढळून आले. पोलिसांनी कोंबड्यांवर शर्यत लावणाऱ्या चार जणांना दबोचले. तर एक आरोपी संधीचा फायदा घेऊन सुसाट पळाला. पोलिसांनी कोंबड्याच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्या संतोष श्यामराव ताजने (३८) रा. चारगाव, प्रवीण पांडुरंग वाभीटकर (४५) रा. ताटेवार ले-आऊट लालगुडा, सुनिल गंगाराम पिदूरकर (४७) रा. चारगाव, शेख मुजीब शेख हमिद (४८) रा. चारगाव यांना रंगेहाथ अटक केली. तर सुरेश काकडे रा. लालगुडा हा पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी घटना स्थळावरून दोन जखमी कोंबडे, झुजीसाठी वापरली जाणारी काती, एक मोबाईल, तिन बाईक व एक मोपेड अशा चार दुचाकी असा एकूण २ लाख २ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पाचही आरोपींवर मजुका च्या कलम १२(ब), १२(क) नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
सदर कार्यवाही एसपी डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, डीबी पथक प्रमुख माया चाटसे, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, अधिक टेकाळे, हरिन्द्र कुमार भारती, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, शंकर चौधरी यांनी केली. पुढील तपास एएसआय भादीकर करित आहे.
कोंबड बाजारावर डीबी पथकाची धाड, चार आरोपी अटकेत तर एक फरार कोंबड बाजारावर डीबी पथकाची धाड, चार आरोपी अटकेत तर एक फरार Reviewed by सह्याद्री चौफेर on October 28, 2021 Rating: 5
Powered by Blogger.