सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२८ ऑक्टो.) : सुरजागड खनिज प्रकल्पाच्या विरोधात एटापल्ली येथे गेल्या २५आँक्टाेंबर पासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून खनन विरोधात येथील स्थानिकांचा संघर्ष सुरू असून एटापल्ली तालुक्यातील बांडे, गुंडजूर, सुरजागड, दमकोंडवाही व कोरची तालुक्यातील आगरी, माहेरी, सोहले,झेंडेपार तथा इतर मंजूर व प्रस्तावित लोह खदानीचे काम तात्काळ थांबवण्यासाठी ३५ हजारांहून अधिक आदिवासी संघटित पणे रस्त्यावर उतरले आहे. अतिशय शिस्त बध्द, अहिंसक,गांधीवादी,शांततेने हे आंदोलन सुरू असल्याचे काल दिसून आले .या प्रकल्पास मंजुरी देण्यात येवू नये यासाठी अनेकदा महामहिम राज्यपाल यांना निवेदने देण्यात आले. आंदोलने, मोर्चे काढून आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष केला आहे.
शासनस्तरावर २५ लोह खनिज खदानीस मंजूरी देणे, प्रस्तावित करणे सुरुच ठेवले आहे. या लोह खनिज प्रकल्पासाठी कंपनीचे दलाल काम करत असून साध्या भोळ्या आदिवासी लोकांची रोजगाराच्या नावाखाली अक्षरशा दिशाभूल
करत आहेत. आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणांऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बळजबरीने ताब्यात घेतले असून एक दोन युवक बेपत्ता असल्याचे बाेलल्या जात आहे.
सदरहु आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विचारवंत पुढे सरसावले असून आंदोलन स्थळी भेट देऊन समर्थन देत आहे.
जन अधिकार मंच गडचिरोलीचे पदाधिकारी रोहिदास राऊत (जेष्ठ पत्रकार द हितवाद) कुसुम ताई अलाम (माजी जि.प.सदस्या तथा साहित्यिक) प्रकाश अर्जुनवार (गांधी विचारधारा) मनोहर हेपट, विलासराव निंबोरकर (अंधश्रद्धा निर्मूलन समिती गडचिरोली) यांचा या आंदाेलनाला पाठिंबा आहे .
कुसुम ताई अलाम यांनी उपराेक्त आंदोलनास चैतन्य निर्माण होईल यासाठी आंदोलनाचे प्रणेते सैनुजी गोटा यांना नुकताच रान जखमांचे गोंदण कविता संग्रह व नर्मदा बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेला संघर्षाला आयाम देणारे लढा नर्मदेचा भेट दिला असल्याचे एका कार्यकर्त्याने या प्रतिनिधीस सांगितले.
एटापल्लीत ठिय्या आंदोलन आरंभ - सुरजागड संघर्षाचे साक्षीदार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 28, 2021
Rating:
