मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका अधिवेशन


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (१४ ऑक्टो) : दिनांक १२/१०/२०२१ रोज मंगळवारी बाजार समिती च्या प्रांगणात दर तिन वर्षानंतर होत असलेल्या पक्ष अधिवेशनासाठी खेडेगावातुन माकपा चे कार्यकर्ते सकाळपासून जमा होत होते. दुपारी १ वा. हातात लाल झेंडे घेऊन हजारो स्त्री-पुरुष शिस्तबद्ध रितीने बाजार समिती मधुन जुन्या बसस्थानक मार्गे क्रांती सुर्य बिरसा मुंडा, कॉम्रेड अण्णा भाऊं साठे, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या प्रतिमेला अभिवादन करून परत अधिवेशन स्थळी लाल बावट्याचा जयघोष करित पोहचले. या सामुहिक अभिवादन रॅलीने महागाव करांचे लक्ष वेधले होते.
अधिवेशनात लाल झेंड्याला सलामी देवुन शहीदांना मौन पाळुन श्रद्धांजलि वाहीली,सर्वप्रथम यवतमाळ जिल्हा सचिव कॉम्रेड कुमार मोहरंमपुरी यांनी राजकीय सद्यःस्थितीचा आढावा घेत अधिवेशनाचे उद्घाटन पर संबोधित केले. या अधिवेशनाला शुभेच्छा देण्यासाठी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार श्री गजानन वाघमारे आणि आंबेडकरी चळवळीतील कर्तुत्ववान नेते प्रा. शरदचंद्र डोंगरे यांनी हजेरी लावली त्यानंतर महागाव तालुक्याचे लढवय्ये शेतकरी नेते कॉम्रेड डी. बी.नाईक यांनी गत तिन वर्षाचा कामकाजाचा अहवाल सादर केला, यावर विविध ७ वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त कले. यावर अॅड, कॉम्रेड दिलीप परचाके यांनी कार्यकर्त्यांना जोशभरेल असे संबोधले व भाजपा सरकारचे जनविरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला.
अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात महत्त्वाचे चार ठराव मंजूर करण्यात आले.
१) उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपुर शेतकरी हत्याकांडाचा निषेधाचा ठराव घेवुन दोषींना कडक शिक्षा व्हावी. 
२) महागाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी २० हजार रुपये द्यावे.
३) महीला बचत गट व बेरोजगार तरुणांना ५० टक्के सबसिडी व शुन्य टक्के व्याजदराने मुद्रा लोण मंजूर करावे आणि
४) मनरेगा ची प्रभावी अंमलबजावणी करावे व नवीन रेशनकार्ड धारकांना धान्य योजनेचा लाभ मिळावा.
असे ठराव सर्वसंमतीने पास करुन भविष्यात पक्ष यावर लक्ष केंद्रित करेल असे जाहीर केले, यासाठी तालुक्यातून आलेल्या ६१ प्रतिनिधी मधुन १५ सदस्याची तालुका बॉडी निवडण्यात आली, यात सचिव पदी एकमताने कॉम्रेड देवीदास मोहकर यांची निवड करण्यात आली. या नवनिर्वाचित मंडळाला कॉम्रेड डी. बी.नाईक यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणूक कशी जिंकता येईल याचे धडे दिले. शेवटी समारोपीय मार्गदर्शन राज्य सचिव मंडळ सदस्य जेष्ठ नेते कॉम्रेड शंकरराव दानव यांनी मोदी शहा जोडगोळीने देश कशा प्रकारे विकायला काढला आहे हे वेळीच ओळखुन नवतरुणांनी भविष्यात लाल झेंड्याखाली एकत्रित येऊन राजकारण केले पाहिजे असे रोखठोकपणे सांगितले व आभार प्रदर्शन नवनिर्वाचित तालुका माकपा सचिव कॉ. देवीदास मोहकर यांनी मानुन अध्यक्षीय मंडळाच्या परवानगी ने ईन्क्लाब जिंदाबाद, लाल बावट्याचा विजय असो, कष्टकरी एकता जिंदाबाद, ईन्क्लाब जिंदाबाद च्या जोरदार घोषणा देवुन सायंकाळी ५ वा कार्यक्रम समपल्याचे जाहीर केले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका अधिवेशन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका अधिवेशन Reviewed by सह्याद्री चौफेर on October 14, 2021 Rating: 5
Powered by Blogger.