सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (६ ऑक्टो.) : वसुधैव कुटुंबकम् सोशल फोरम सावंगी मेघे द्वारा निःशुल्क मेकअप सेमिनार नुकतेच आयोजित करण्यात आले होते. आयोजित सेमिनार मध्ये उपराजधानी नागपूरच्या इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट शुभांगी नरेंद्र महाले यांनी ब्रायडल मेकअप आणि वेस्टन मेकअपचा नमुना या वेळी सादर केला. त्या सोबतच मेकअप करताना छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी. तसेच आपल्या क्लाइंटचा आनंद आणि समाधान महत्वाचे आहे हे ध्यानात ठेवावे. या बाबत सविस्तर माहिती या सेमिनार मध्ये देण्यांत आली. मेकअप करताना चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट वापरावे ही विशेष सुचना या वेळी करण्यात आली.
उपराेक्त सेमिनार मध्ये सावंगी मेघे व या परिसरातील एकुण ३३ महिला व तरुणींनी आपला सहभाग नाेंदविला हाेता. कार्यक्रमाचे आयोजन वसुधैव कुटुंबकम सोशल फोरमच्या अध्यक्षा ॲड.अर्चना प्रवीण पेठे (सावंगी मेघे) यांनी केले होते. शुभांगी महाले यांना आंतरराष्ट्रीय आर्टिस्ट रिटा मेश्राम,अर्चना मोहितकर आणि शुभांगी हेडावू यांनी या वेळी विशेष सहकार्य केले. मॉडेल म्हणून कु. प्रतीक्षा ढोक व कु.वैष्णवी वरभे यांची या सेमिनार मध्ये निवड करण्यात आली.
या सेमिनारच्या यशस्वीते करिता जनता जनार्दन बहुउद्देशीय संस्था सावंगी मेघेचे अध्यक्ष प्रविण पेठे,नरेंद्र महाले,कु.भूमिका महाले,कु.भावना ढोक यांनी सहकार्य केले. वसुधैव कुटुंबकम् सोशल फोरम सावंगी मेघे द्वारा उत्तमोत्तम कार्यक्रम भविष्यात घेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे मनाेगत अधिवक्ता अर्चना पेठे यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाेलतांना व्यक्त केले.
वसुवधैव कुटुंबकम् साेशल फाेरमच्या वतीने सावंगी मेघेला नि:शुल्क मेकअप सेमिनार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 06, 2021
Rating:
