झाडीपट्टी नाट्य रंगभुमी सुरु होत असल्याने कलावंतांच्या आशा पल्लवीत; नाट्यशौकीनांत ऊत्साह


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वडसा, (६ ऑक्टो.) : गेल्या दोन वर्षापासुन कोरोनाच्या टाळेबंदीमुळे झाडीपट्टींच्या नाट्यप्रयोगांना परवानगी नाकारल्यामुळे या भरोष्यावरती असलेल्या हजारो कलावंतांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. सोबतच नाट्यशौकीनांच्या देखील ऊत्साहावर विरजन पडले होते, पहीली आणि दुसरी लाट ओसरल्यानंतर तीसरी लाट येण्याचे भाकीत काही तज्ञांकडुन वर्तविण्यात आल्याने पुन्हा टाळेबंदी होऊन नाट्यप्रयोग होणार की, नाही या चिंतेत कलावंत सापडला होता. परंतु सद्यस्थीत तीसरी लाट येण्याचे कुठलीही चिन्ह दिसत नसल्यामुळे हळुहळु संपुर्ण महाराष्ट अनलॉक कडे वाटचाल करीत आहे.

28 सप्टेंबर पासुन पॅसेंजर रेल्वे सुरु करण्यात आली. 4 आक्टोंबर पासुन शाळा सुरु करण्यात आल्या. 7 आक्टोंबर पासुन मंदीर सुरु होत आहेत. त्याचप्रमाने 22 आक्टोंबर पासुन नाटकांना परवानगी मिळणार असे, मा.मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यामुळे दोन वर्षापासुन नैराष्येत असलेल्या नाट्यकलावंतांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.

दिवाळी पासुन सुरु होत असलेल्या या हंगामादरम्यान दिवसा मंडई आणि रात्री नाटक ही झाडीपट्टीची परंपरा मानल्या जाते, एक ऊत्सव समजल्या जातो. या ऊत्सवाकरीता ज्या गावला मंडई आणि नाटक असेल, त्या गावला गावातील बाहेर गेलेले लोकं या निमीत्ताने परत येतात. नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी नाटक पहाण्याकरीता येतात. परंतु दोन वर्षापासुन टाळेबंदी मुळे नाट्यप्रयोग बंद असल्याने नाट्यशौकीनांची पण निराशा झाली होती, परंतु आता नाट्यप्रयोग सुरु होत असल्यामुळे नाट्यशौकीन देखील ऊत्साहात दिसत आहेत. आणि झाडीपट्टीतील चारही जिल्ह्यातील नाट्यमंडळ नाटकांचे माहेरघर असलेल्या वडसा येथे जाऊन नाटकांची बुकींग करीत आहेत.

गेल्या दोन वर्षापासुन बंद असलेला झाडीपट्टीच्या नाटकांचा पडदा यंदा ऊघडणार असल्याने नाट्यकलावंत तसेच नाट्यशौकीनांमध्ये देखील ऊत्साह पहायला मिळत आहे.
22 आक्टोंबर पासुन नाट्यप्रयोग सुरु करण्याचे  शासनाने अभीवचन दिल्यामुळे अखिल झाडीपट्टी नाट्यकलावंत परिषदेेने शासनाचे आभार मानले. तसेच झाडीपट्टीतील समस्त रंगकर्मींना येणाऱ्या  नाट्यहंगामाकरीता शुभेच्छा दिल्या.

 "22 आक्टोंबर पासुन तमाम महाराष्ट्रातील नाट्यप्रयोग सुरु करण्याबाबत अभिवचन दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा.ऊद्धवसाहेब ठाकरे, सांस्कृतीक मंत्री मा.अमीत देशमुख, आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.विजय वडेट्टीवार यांचे खुप-खुप आभार..आणि कलावंतांना येणाऱ्या सीजनकरीता शुभेच्छा!"
~शेखर पटले
अध्यक्ष, अखिल झाडीपट्टी नाट्य कलावंत परिषद

"यंदा झाडीपट्टीचा पडदा ऊघडनारच..त्यामुळे नाट्यमंडळांनी आप-आपल्या आवडत्या रंगभुमीची नाट्यप्रयोग बुकींग करुन आपली परंपरा जोपासावी व पुर्ववत झाडीचे वैभव परत मीळवावे..नाट्यप्रयोगांना परवानगी जाहीर केल्याबद्दल राज्यशासनाचे आभार"
मुकेश गेडाम
सचिव, अखिल झाडीपट्टी नाट्य कलावंत परिषद

"22 आक्टोंबर पासुन शासनाने नाट्यप्रयोग सुरु करण्याचे राज्याला अभीवचन दिल्यामुळे झाडीपट्टीची पंढरी असलेल्या वडसा येथील विविध रंगभुमीचे कार्यालय सजलेले आहेत. आपण आपले आवडते नाटक बुकींग करावे असे नाट्यमंडळांना आवाहन"
~ किरपाल सयाम
ऊपाध्यक्ष, अखिल झाडीपट्टी नाट्य कलावंत परिषद

"गेल्या दोन वर्षापासुन नाट्यप्रयोग बंद असल्याने कलावंत निराश होते पण, आता पुन्हा नव्या ऊमेदीने जोमाने तयारीला लागुन झाडीपट्टीचा नाट्यवैभव सर्वांनी मिळुन कायम राखु"
~ज्ञानेश्वरी कापगते
सहसचिव, अखिल झाडीपट्टी नाट्य कलावंत परिषद
झाडीपट्टी नाट्य रंगभुमी सुरु होत असल्याने कलावंतांच्या आशा पल्लवीत; नाट्यशौकीनांत ऊत्साह झाडीपट्टी नाट्य रंगभुमी सुरु होत असल्याने कलावंतांच्या आशा पल्लवीत; नाट्यशौकीनांत ऊत्साह Reviewed by सह्याद्री चौफेर on October 06, 2021 Rating: 5
Powered by Blogger.