सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (६ ऑक्टो.) : ब्ल्यु मिशन मल्टिपरपज पब्लिक ट्रस्ट चंद्रपूर निर्मित भदंत सुमनवन्नो महास्थविर पिंपळवनात पाचव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने धर्मांतरण केलेल्या विविध व इतर धर्मातील ज्या लोकांनी बौद्ध धम्म स्विकारला त्यांचा भिक्खु संघ व ब्ल्यु मिशन चंद्रपूर तर्फे नुकताच सत्कार करण्यात आला.
या वेळी भदंत सुमनवन्नो, भदंत संघवंश व भदंत रुपानंद यांच्या हस्ते समाजातील आंबेडकरी कार्यकर्ते यांचा सन्मान देखिल करण्यात आला. भिक्खु संघाने या आयोजित कार्यक्रमात माेलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन अजय पागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रविंद्र मोटघरे यांनी केले.
याच कार्यक्रमात दि.१ ऑक्टाेबरला ब्ल्यु मिशन मल्टिपरपज पब्लिक ट्रस्ट चंद्रपूर च्या अध्यक्षा अल्काताई मोटघरे यांचा वाढदिवस देखिल साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळी तसेच उपासक व उपासिका उपस्थित होते.
चंद्रपूर : बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसार कार्यक्रम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 06, 2021
Rating:
