सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे
वरोरा, (१५ ऑक्टो.) : ही कारवाई दरम्यान जप्त केलेले साहीत्य व कोणतेही कारवाई न करण्यासाठी साठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वरोरा रेल्वे सुरक्षा बल उपनिरीक्षक नागपूर सीबीआय व एसीबी च्या पथकाने बुधवारी रात्री नऊ च्या दरम्यान, गोपिका मानकर त्यांना रेल्वे सुरक्षा बल ठाणा त्यांना रंगेहात लाच घेतांना सीबीआय व एसीबी यांनी सापळा रचून गोपिका मानकर (पी एस आय) यांना अटक करण्यात आली.
सविस्तर असे की, तक्रारदाराचे भद्रावती येथे नेट कॅफेचे दुकानं आहे. त्या मध्ये रेल्वे तिकीट बुकिंग सह ऑनलाईन कामे केलेली जातात. या कॅफेमध्ये वरोरा सुरक्षा बल चे उपनिरीक्षक गोपिका मानकर पीएसआय काही दिवस अगोदर भद्रावती येथे जाऊन काही साहित्य जप्त केलेले होते, ते साहित्य सोडवण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी पीएसआय गोपिका मानकर यांनी एक लाख रुपयांची मागणी केली. तडजोडी नंतर साठ हजार रुपये देण्याची कबुली झाली मात्र, तक्रार दाराने याबद्दल ची तक्रार नागपूर सीबीआय व एसीबी कडे केली.
पोलिसांनी सापळा रचून बुधवार रात्री ९ च्या दरम्यान, त्यांना रंगेहाथ वरोरा रेल्वे ठाण्यात अटक करण्यात आली. त्यानंतर सीबीआय व एसीबी चे पोलीस अधीक्षक सकाळी बारा एक च्या दरम्यान वरोरा शेषन कोर्टात गुरुवारी नेले असता कोर्टात १६ तारखे पर्यंत पिशियार देण्यात आले. ही कारवाही नागपूर सीबीआय व एसीबी चे पोलीस अधिक्षक एम एस खान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कल्याणी हुमने, पोलीस निरीक्षक नीरज कुमार गुप्ता, पोलीस निरीक्षक कविता इसरकर पोलिस उपनिरीक्षक विनोद कराले, डब्ल्यूपीसी कोमल गुजर, संदीप ढोबळे यांनीही कारवाही केली.
"केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या कार्यालयातील कर्मचारी जर लालची मागणी करीत असेल तर त्यासंदर्भातील तक्रार सीबीआय व एसीबीकडे करावी."
~ सलीम खान
पोलिस अधीक्षक
सीबिआय व एसीबी नागपूर
साठ हजारांची लाच घेताना वरोरा येथील रेल्वे उपनिरीक्षक सुरक्षा बलाला रंगेहात अटक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 15, 2021
Rating:
