सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (१५ ऑक्टो.) : नागभिड तालुक्याच्या बाळापूर तळाेधी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात रक्तगट तपासणी व एक्सरे मशिन उपलब्ध नसल्यामुळे ती त्वरीत उपलब्ध करुन देण्यात यावी या मागण्यां साठी सोनापूर (बू.) येथील प्रहारचे सेवक वेणुदास गभणे यांनी दि. १३ ऑक्टोंबर २०२१ ला बाळापूर (तळाेधी) प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांना एक लेखी निवेदन सादर केले.
निवेदन देतांना जनशक्ती पक्षाचे प्रहार सेवक वेणुदास गभणे, वृषभ खापर्डे, शेखर फटिंग, निलेश डोमळे, विकी फुलवाणी, दीपक माणूसमारे, राहुल दाडमल, रोहित कुमरे, अक्षय खोब्रागडे, रोहित चौधरी, निखिल मेश्राम, संतोष जिवतोडे, आकाश चौधरी व इतर प्रहार सेवक उपस्थित होते.
बाळापूर (तळाेधी) आराेग्य केन्द्रात एक्सरे मशिन व रक्त गट तपासणी मशिन उपलब्ध करा - प्रहारचे निवेदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 15, 2021
Rating:
