प्रशासनाला जागे करण्यासाठी येत्या २७ ऑक्टाेंबरला ढाेल वाजवित प्रहारचे चंद्रपूरात धांगड धिंगा आंदोलन


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२५ ऑक्टो.) : गेल्या अनेक महिण्यांपासून विविध प्रश्नांना घेवून प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमांतुन जिल्हाधिकारी कार्यालय तथा सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालयात विविध मागण्यांचा सतत पाठपुरावा केला. परंतु त्यांचे कडुन चंद्रपूर प्रहार जनशक्ती पार्टीला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान जिल्हा प्रशासनाला जागे करण्यांसाठी येत्या २७ ऑक्टाेंबरला सदरहु पार्टी कडुन ढाेल वाजवून धांगडधिंगा आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदाेलनाची सुरुवात शहरातील स्थानिक गांधी चाैकातुन सकाळी ११:३०वाजता हाेत असल्याची माहिती आज सोमवार दि.२५  ऑक्टाेंबरला जिल्हाधिकारी व पाेलिस अधिक्षक यांना आंदाेलनाचे एक लेखी निवेदन सादर केल्या नंतर चंद्रपूर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार सेवक महेश हजारे यांनी या प्रतिनिधीस दिली. त्यांनी सादर केलेल्या निवेदनात प्रामुख्याने खालील मागण्यांचा समावेश हाेता.
 
पैनगंगा काेळसा खदानी कडे असलेल्या काेरपना तालुक्यातील बाेरगांव येथील युवकांना राेजगार मिळण्या बाबत, आदिवासी मांडवा सोसायटी येथील बाेगस कारभाराची चाैकशी करण्याबाबत तसेच तत्कालीन व्यवस्थापक वामन गाेंधळी यांचे गैरव्यवहाराची याेग्य व सखाेल चाैकशी व्हावी, चिमूर तालुक्यातील काग येथील वापरात असलेल्या पांदण रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याबाबत, नवनिर्माण मेडीकल काँलेजचे ठेकेदार शापुर्जी पालाेन्जी यांनी व्देशभावनेतुन कामगारांना कामावरुन कमी केल्या बाबत व पंचिग रिपोर्ट देण्यांस टाळाटाळ करीत असल्याबाबत चाैकशी करण्याबाबत ! आज दिलेल्या निवेदनात या मागण्यांचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला हाेता, प्रहारच्या या हाेवू घातलेल्या आंदाेलनात शेतकरी सुशिक्षित बेराेजगार सहभागी हाेत आहे.

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी व पाेलिस अधिक्षक यांना निवेदन देतांना प्रहारचे महेश हजारे, अफराेज अली, शेरखान पठान, नितीन गाेरे, माराेती राजुरकर, अशिद मेश्राम, अजय लिंगमे, प्रथम बुच्चे, अमाेल लांडगे व सचिन बांबाेळे उपस्थित हाेते.
प्रशासनाला जागे करण्यासाठी येत्या २७ ऑक्टाेंबरला ढाेल वाजवित प्रहारचे चंद्रपूरात धांगड धिंगा आंदोलन प्रशासनाला जागे करण्यासाठी येत्या २७ ऑक्टाेंबरला ढाेल वाजवित प्रहारचे चंद्रपूरात धांगड धिंगा आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on October 25, 2021 Rating: 5
Powered by Blogger.