सह्याद्री न्यूज नेटवर्क |
रत्नागिरी, (२५ ऑक्टो.) : दिनांक २३ ऑक्टो. २०२१ रोजी पुणे येथील पर्यटक समितीचे, (पर्यटक प्रेमी) पडवणेवाडीत आले असे सामाजिक कार्यकर्ते श्री सरपडवळ यांनी सांगितले.
जवळपास पन्नास जण आहेत, त्यात दोन पुणे पाटबंधारे विभागाचे अधिकारी आहेत, चार मुंबई सचिवालय मधील, तर पाच शिवसैनिक आहेत,
तसेच छत्रपती शिवाजी महाराज गडकिल्ले संवर्धनचे मावळे ही आले होते.
सर्वांनी "वरवडे" गावातील पडवणेवाडीची धुपुन गेलेला, फुटूनवाहून गेलेल्या भागाची एकत्रित पाहणी करण्यात आली. त्या नंतर या विषयी त्यांनी येथील सु. बा. सरपडवळ यांच्याशी चर्चा केली, यावेळी काही गहन विषयावर मार्गदर्शन ही केले.
समुद्राच्या लाटेने अख्ख गाव ढवळून निघत असतांना किंबहुना कोणी या गावाकडे लक्ष द्यायला समोर येत नव्हते, मात्र पुणे पर्यटक प्रेमी दाखल झाल्याने येथील ग्रामवासीयात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या सर्व पर्यटक प्रेमींनी पडवणेवाडीची दखल घेतली आहे.
त्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार प्रदोष बळीराम पडवळ यांनी मानले.
पर्यटक प्रेमीकडून पडवणेवाडीची दखल घेण्यास सुरुवात...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 25, 2021
Rating:
