सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (२५ ऑक्टो.) : आज मारेगाव पोलीस स्टेशनच्या प्रांगणात तालुका विधी सेवा समिती च्या वतीने तालुक्यातील पोलीस पाटलांकरिता कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारेगाव न्यायालयाचे न्यायाधीश निलेश वासाडे हे उपस्थित होते तर, प्रमुख अतिथी म्हणून मारेगावचे पोलीस निरीक्षक राजेश पुरी, जेष्ठ विधिद्य परवेज पठाण, माजी जिल्हा उपशिक्षणाधिकारी साबिर शेख, माजी मुख्याध्यापक विठ्ठल गजभिये यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख अतिथिंनी तालुक्यातील पोलीस पाटलांना विविध कायदेशीर बाबींवर विस्तृत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन ॲड मेहमूद पठाण यांनी तर, आभार प्रदर्शन ॲड करिष्मा किन्हेकार यांनी केले.
या कार्यक्रमाला ॲड आशिष पाटील, ॲड नलिनी कोडापे, ॲड काजल शेख, ॲड भाग्यश्री बदखल, ॲड मेघा कोडापे, यांचेसह न्यायालयीन कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
मारेगावात पोलीस पाटलांना कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 25, 2021
Rating:
