वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडाेजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२५ ऑक्टो.) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी महोत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. महोत्सवाच्या निमित्ताने लाईव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

कोरोनाचे संकट असल्यामुळे पुण्यतिथी महोत्सवात गर्दी होणार नाही याची दक्षता अखिल भारतीय सेवामंडळाने घेतली आहे. त्यांचे आदेशाचे पालन करीत हनुमान मंदीर भिवापुर चंद्रपुर येथे गुरुदेव उपासिका मंगला आखरे यांच्या सहकार्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाला उपासक उपासिका एकत्र येऊन या निमित्ताने सामुदायिक प्रार्थना, ध्यान, चिंतन असे वेगवेगळ्या कार्यक्रम करण्यात येतात. 

वंदनिय राष्ट्रसंत श्री. तुकडाेजी महाराज यांचा ५३ व्या पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने गुरुदेव प्रेमीनी तुकडोजी महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. आज लाईव्ह कार्यक्रम सोमवार दि.२५ ऑक्टाेंबरला 
या कार्यक्रमाला चंद्रपुर जिल्ह्याचे सेवाधिकारी गुरुदेव उपासक दत्ताभाऊ हजारे, नगरसेविका अनुराधाताई हजारे, मंगलाताई आखरे, माजी नगर सेवक राजेंद्र आखरे, अ.भा.गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, पुरुष महीला भजन मंडळाचे पदाधिकारी व सदस्यगण तसेच गुरुदेव उपासक,उपासिका बहुसंख्येंने उपस्थित होते.
वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडाेजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडाेजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव Reviewed by सह्याद्री चौफेर on October 25, 2021 Rating: 5
Powered by Blogger.