सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (१० ऑक्टो.) : उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपाच्या योगी सरकार कडून चिरडून टाकल्याच्या घटनेचा संपूर्ण देशभरात सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. देशातील शेतकऱ्यांवर भाजपच्या केंद्र सरकार कडून व भाजपशासित राज्य सरकारकडून सातत्याने अन्याय अत्याचार होत आहे. भाजप सरकारचे हे कृत्य हिटलर व मुसोलिनी लाही लाजवेल अशा प्रकारचे असून लखीमपुर खीरी येथील शेतकऱ्यांना सामूहिकरित्या ठार मारण्याची घटना 'जनरल डायर' ने केलेल्या हत्याकांड ची आठवण करून देणारी आहे. या प्रकरणाच्या विरोधात उद्या दि.११ ला "मारेगाव बंद" ठेवण्याचे ठरले आहे. या बंदला सर्वांनी पाठिंबा देत,शहरात महाविकास आघाडी च्या झालेल्या बैठकीत सर्व पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
उद्या बंदचे आवाहन : यशस्वी करण्यासाठी मारेगावात महाविकास आघाडीची बैठक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 10, 2021
Rating:
