महाराष्ट्र विधान मंडळ अंदाज समितीचा येत्या १२ ऑक्टाेबर पासून चंद्रपूर जिल्हा दाैरा, जिल्हाधिकारी कार्यालयातील पटवारी संघटनेची सभा रद्द
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (१० ऑक्टो : महाराष्ट्र विधान मंडळ अंदाज समितीचा चंद्रपूर जिल्हा दाैरा येत्या १२ ऑक्टाेंबर पासुन सुरु हाेत असुन ताे दाैरा १४ ऑक्टाेंबर पर्यंत राहणार असल्याचे समजते.
दरम्यान दि.१२ ऑक्टाेंबरला दुपारी ४वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पटवाऱ्यांच्या आर्थिक व सेवाविषयक प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी जिल्हा पटवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक सभा आयाेजित केली हाेती. परंतु उपरोक्त समितीच्या चंद्रपूर जिल्हा दाैऱ्यामुळे ही सभा आता दि.२६ ऑक्टाेंबरला दुपारी ११ वाजता हाेत असल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांचे कार्यालयातुन जिल्हा पटवारी संघटनेचे अध्यक्ष व सचिवास पाठविण्यांत आले आहे.
महाराष्ट्र विधान मंडळ अंदाज समिती या दाैऱ्या अंतर्गत जिल्ह्यातील विविध विभागातर्फे सुरु असलेल्या कामांना भेटी देणार असल्याचे वृत्त आहे. सुट्टी च्या ही दिवसात काही कर्माचारी या समितीच्या दाैऱ्यामुळे शासकीय कामात व्यस्त असल्याचे दिसून आले.
महाराष्ट्र विधान मंडळ अंदाज समितीचा येत्या १२ ऑक्टाेबर पासून चंद्रपूर जिल्हा दाैरा, जिल्हाधिकारी कार्यालयातील पटवारी संघटनेची सभा रद्द
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 10, 2021
Rating:
