अल्पवयीन मुलीचे सतत शारीरिक शोषण करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी केली अटक

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (१० ऑक्टो.) : अल्पवयीन शाळाकरी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर तिचे वारंवार लैगिक शोषण होत राहिल्याने त्या नराधमाची हवसखोर प्रवृत्ती तिला किळसवाणी वाटू लागली. त्याचा सततचा अत्याचार पीडितेला अपमाणीत करू लागला. वासनांध तरुणाच्या वासनेची शिकार ठरलेली ही अल्पवयीन मुलगी नराधमाच्या नेहमी होणाऱ्या लैंगिक अत्याचारामुळे कमालीची वैतागली. अखेर जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्यामुळे मानसिक तणावात आलेल्या या शाळकरी मुलीने स्वतःचे जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. तिने टॉयलेट स्वच्छ करणारे द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने द्रव्य प्राशन केल्याचे वेळीच तिच्या आईच्या लक्षात आल्याने तिचा जिव वाचला. मुलीच्या आईने लगेच तिला वणी येथिल खाजगी रुग्णालयात दाखल केले. जलद उपचार मिळाल्याने तिची प्रकृती सुधारली. ती स्वस्थ झाल्यानंतर तिला आत्महत्या करण्यामागचे कारण विचारले असता हा गंभीर व संताप जनक प्रकार समोर आला. 

तालुक्यातील पुनवट या गावात राहणारी ही अल्पवयीन मुलगी नवव्या वर्गात शिकते. त्याच गावात राहणाऱ्या सागर राजू सातपुते (२४) या नराधमाची या मुलीवर वाईट नजर होती. एक दिवस त्याने या मुलीला रस्त्यात गाठून आपले प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने मुलगी चांगलीच घाबरली. त्याच्या प्रेम व्यक्त करण्याने धास्तावलेल्या या मुलीने याची कुठेच वाच्यता केली नाही. त्यामुळे आणखीच हिम्मत वाढलेल्या आरोपीने २७ सप्टेंबरला परत तिला रस्त्यात गाठून जबरदस्ती आपल्या घरी नेले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास तिच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिली. पीडिता झालेल्या अत्याचाराने चांगलीच हादरली. तिने घरातील कुणालाही काही सांगितले नाही. आणी येथेच घात झाला. नराधमाचे मनसुबे आणखीच वाढले. त्याने ६ ऑक्टोबरला परत तिला घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या किळसवाण्या प्रकाराने तिला अपमानित झाल्यासारखं वाटू लागलं. वारंवार होणाऱ्या अतिप्रसंगामुळे ती मानसिक तणावात आली. हा वासनांध तरुण नेहमीच वासना भागविण्याकरिता आपला वापर करेल या मानसिक तणावातून अखेर तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण मुलीने द्रव्य प्राशन केल्याचे आईच्या लक्षात येताच आईने तिला तत्काळ वणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. आता तिची प्रकृती धोक्याबाहेर असून मुलीने सांगितल्या प्रमाणे तिच्या नातेवाईकांनी मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमा विरुद्ध शिरपूर पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी सागर राजू सातपुते (२४) याच्यावर भादंवि च्या कलम ३७६(३), ३५D, ३४१, ५०६ व बाळ लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४, ६, ८, १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

पुढील तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.
अल्पवयीन मुलीचे सतत शारीरिक शोषण करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी केली अटक अल्पवयीन मुलीचे सतत शारीरिक शोषण करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी केली अटक Reviewed by सह्याद्री चौफेर on October 10, 2021 Rating: 5
Powered by Blogger.