लखीमपूर खिरी येथील क्रूर घटनेच्या निषेधार्थ भाजपा सकारच्या विरोधात काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोलेंच्या नेत्रूत्वात उद्या ११ ऑक्टोंबरला "महाराष्ट्र बंद' आंदोलन

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (१० ऑक्टो.) : केंद्रातील भाजपा सरकारने कृषी विरोधी तीन जुलमी कायदे पारित करून शेतक-यांचे न्याय हक्क हिरावून घेतले आहे. तसेच शेतकरी विरोधी धोरणे अवलंबिली जात आहेत. या धोरणाच्या विरोधात तसेच कृषी विषयक तीन कायदे रद्द करण्यासाठी वर्षभरापासून देशाचे पोशिंदे, शेतकरी अहिंसेच्या मार्गाने न्याय हक्कासाठी लढा देत आहेत.

शेतक-यांचा हा लढा दडपून टाकण्यासाठी भाजपा सरकारचे हिंसेचे मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. 3 ऑक्टोंबर 2021 रोजी लखीमपूर खिरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाने आंदोलन कर्त्या शेतक-यांच्या जमावावर भरधाव गाडी चालविली व त्यात ४ आंदोलनकर्त्यासह अन्य चार अश्या 8 लोंकाचा बळी गेला या क्रूर कृत्याने पीडीत मृत शेतक-यांच्या कुटूबियांचे सांत्वन करण्यासाठी व त्यांना सर्वतोपरीची मदत देऊ पीडीतांच्या कुटुंबियांचे अश्रु पुसण्यांसाठी जात असलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंकाजी गांधी यांना उत्तरप्रदेशच्या योगी सरकारच्या पोलीसांनी अडविले त्यांच्याशी गैरवर्तन केले व चुकीच्या कायद्यांची कलम लावून त्यांना जेलबंद केले. खासदार हुडा यांच्यावर ही हल्ला केला.

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचे विरोधात व लखीमपुर खीर येथीलपुर घटनेच्या निषेधार्थ कॉंग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवार दिनांक 11 ऑक्टो. 2021 रोजी "महाराष्ट्र बंद' व जन आंदोलनाचे अवाहन केले आहे. या आंदोलानात माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांचे नेतृत्वात विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूर सहभागी होत आहे.

शेतकरी, शेतमजूर कामगार व जनतेनी या आंदोलनात सहभागी होऊन महाराष्ट्र बंद आंदाेलन यशस्वी करावे असे आवाहन विदर्भ किसान मजदूर काँग्रेसने एका प्रसिध्दी पत्रकातुन आज केले आहे.
लखीमपूर खिरी येथील क्रूर घटनेच्या निषेधार्थ भाजपा सकारच्या विरोधात काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोलेंच्या नेत्रूत्वात उद्या ११ ऑक्टोंबरला "महाराष्ट्र बंद' आंदोलन लखीमपूर खिरी येथील क्रूर घटनेच्या निषेधार्थ भाजपा सकारच्या विरोधात काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोलेंच्या नेत्रूत्वात उद्या ११ ऑक्टोंबरला "महाराष्ट्र बंद' आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on October 10, 2021 Rating: 5
Powered by Blogger.