सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
पांढरकवडा, (२० ऑक्टो.) : व्यवस्थित हात धुण्याची सवय ही खरेतर कायमस्वरूपी हवी. परंतु तसे होत नसल्याने दरवर्षी १५ ऑक्टोबर हा "जागतिक हात धुवा दिन" म्हणून पाळला जातो. जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, स्वच्छ भारत अभियान याबाबत मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करीत आहे. हात धुण्याची सवय लोकांच्या अंगवळणी पडावी हा त्यामागचा उद्देश आहे.
सार्वजनिक स्वच्छता व वैयक्तिक स्वच्छता या सारख्या महत्त्वपूर्ण बाबींन वर ऋस्त्र कल्लू. द्वारा अर्थसंचलित व केअर इंडिया या संस्थेद्वारे संचलित महिला + पाणी (वुमन + वॉटर) प्रकल्पांतर्गत पांढरकवडा तालुक्यात "जागतिक हात धुवा दिन" हा १५ ऑक्टोंबर ते २३ ऑक्टोंबर पर्यंत गाव पातळी वर पिंपरी, दातपाडी, कोंघारा, धारणा, घोडधरा, सखी, वाढोना, साखरा, वेडद, तातापुर, झुंजारपूर या ग्रामीण भागात कार्यक्रम करण्यात आला आहे. महिलांची वैयक्तिक प्रगती व कारकीर्द विकास या प्रशिक्षणाद्वारे गावपातळीवर महिलांना ज्या शैक्षणिक गटांच्या मार्फत आरोग्य आरोग्य स्वच्छता पाणी या विषयावर वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पांढरकवडा तालुक्यातील येत आहे "माझे कुटुंब माझी जबाबदारी" "स्वच्छता ठेवा घरोघरी" याविषयी संस्थेचे अधिकारी तथा ट्रेनर मार्गदर्शन करत आहे. उपक्रमात हात धुण्याच्या पद्धती समजून सांगण्यात येत आहे.
सदर वुमन वॉटर प्रकल्पाची कार्यकारी व्यवस्थापक रविकांत घाटोलजी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक अमोल बोरकर सर व केअर इंडिया टीम ची सर्व ट्रेनर किरण बाराहाते, कविता जुमनाके, शीतल ठाकरे, विशाखा ताई, ज्योती फुलझले, प्रेमीला आत्राम,विद्या वातीले,आशिया शबीर, सचिन संदलवार, सलमान खान व इतर कर्मचारी आपली महत्त्वपूर्ण भूमिका राबवत आहे.
अर्थसंचित केअर इंडिया संस्थेद्वारे जागतिक जागतिक हात धुवा दिन साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 20, 2021
Rating:
