आल्या आल्याच..साहेबांनी अवैध धंद्याचा घाषा गुंडाळण्यासाठी कंबर कसली, दोन दिवसात तीन ठिकाणी टाकल्या धाडी

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मारेगाव, (२० ऑक्टो.) : मारेगाव येथे नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक यांनी अवैध धंद्याना आळा घालण्यासाठी कंबर कसल्याचे चित्र दिसून येत आहे. आल्या आल्याच तालुक्यातील 'किस्मत आजमवण्याऱ्या' ठिकाणी धाड टाकून तसं चालवणाऱ्यांना घाम फुटला. त्याच उदाहरण कुंभा येथील चिकन मार्केटमधील परिसरात एका दुकानामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड टाकून पत्ते खेळणाऱ्या २ आरोपींना ताब्यात घेतले व
त्यांना सुचनापत्र देऊन सोडून दिले. मात्र, तीन आरोपी अजूनही फरार असून त्या आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत असे वृत्त आहे. साहेब आले आणि विविध पद्धतीने शक्कल लढवत तालुक्यातील अवैध धंद्याचा घाषा गुंडाळण्यात काहींशे यश आले आहे.
दि.१८ ऑक्टोबर ला दुपारी २ वाजताच्या दरम्यान, पोलिसांनी कुंभा परिसरातील चिकन मार्केट मधील परिसरात धाड टाकून पोलिसांनी जुगार पत्यासह काही रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र, अटक केलेल्या आरोपींना सूचना पत्रक देऊन सोडण्यात आले. तीन संशयित जुआरी पळून गेले असून, या घटनेचा अधिक तपास नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार राजू टेकाम, अजय वाभिटकर, रजनीकांत पाटील करीत आहेत.

तसेच रविवार दि. १७ ऑक्टोबर ला मार्डी चोपण रस्त्याच्या कडेला टेन्ट मध्ये धाड टाकून पोलिसांनी एका वरली मटका पट्टी घेणाऱ्या इसमास अटक केली. जवळपास १ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून मटका पट्टी लिहिण्याचे साहित्य व एकूण ४८५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी तातडीने त्याला अटक केली असून, या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा त्याचेवर दाखल केला आहे.
त्यामुळे अवैध व्यावसायिकात धास्ती निर्माण झाली अशी चर्चा जोरात असतांना १७ ऑक्टोबर ला पुन्हा शहरात पोस्ट ऑफिस जवळील हनुमान मंदिराच्या बाजूला खुलेआम दारूविक्री सुरू असल्याचे परिसरातील नागरिकांनी पोलीसांना माहिती देताच जमादार अचलेवार, यांनी धाड टाकून त्या ठिकाणी दारू च्या २२ शिषा जप्त केल्या. परंतु तेथून दारू विक्रेत्याने पोबारा केला.

२ दिवसात ३ विविध ठिकाणी धाडी टाकून पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांची चर्चा जनमानसात होत आहे. मात्र, हे छोट्या छोट्या कारवाईत काय पडलं! "कुछ बडा हॊ जाये" आणि साहेब करतील असे, म्हणत याकडे जनतेच्या नजरा लागल्या आहेत.
आल्या आल्याच..साहेबांनी अवैध धंद्याचा घाषा गुंडाळण्यासाठी कंबर कसली, दोन दिवसात तीन ठिकाणी टाकल्या धाडी आल्या आल्याच..साहेबांनी अवैध धंद्याचा घाषा गुंडाळण्यासाठी कंबर कसली, दोन दिवसात तीन ठिकाणी टाकल्या धाडी Reviewed by सह्याद्री चौफेर on October 20, 2021 Rating: 5
Powered by Blogger.