महिलांनी बाबासाहेबांना अपेक्षित असलेली बौद्ध सांस्कृतिक चळवळ अधिक जबाबदारीनी पुढे न्यावी- समतादूत प्रज्ञा राजूरवाडे
सह्याद्री न्यूज | रामचंद्र कामडी
चिमूर, (१९ ऑक्टो.) : 14 ऑक्टोबर 1956 हा धम्मचक्र प्रवर्तन दिन धम्मक्रांती करून बाबासाहेबांनी भारतातील बौद्ध संस्कृतीचा नव्याने आरंभ केला. त्याच संस्कृतीत संविधान,स्त्री मुक्तीच्या संदर्भात केलेली महान क्रांती आहे. अंधश्रद्धा वर आधारित दैववादाची शिकवण देणाऱ्या स्त्री ला मानसिक गुलामगिरीत बंदिस्त करून ठेवणाऱ्या संस्कृती पासुन तिला मुक्त बुद्धाधम्मची दीक्षा देऊन केले मानवतावादी अशा नावसमाज निर्मितीकरिता आवश्यक जीवनमार्ग जीवनमूल्ये दाखवून दिले.
बुद्धा संस्कृतीतच स्त्री-पुरुष समानता स्त्री कडे समानतेने बघण्याची उदात्त दृष्टी आहे. बुद्धा धम्मात स्त्रीला माणूस समजून तिच्या ज्ञानाचा, समतेचा, स्वतंत्र, बंधुतेचा मानवी हक्क बुद्ध धम्मात मिळवून दिला व स्त्री मंधील अस्मिता जागृत करून तिच्या आत्मोद्वाराचा मार्ग तिला मोकळा करून दिला अशा या मानवतावादी बुद्धाधम्माची दीक्षा देऊन बाबासाहेबांनी भारतांतील समस्त स्त्री च्या विकासासाठी सुखशांतीच्या कल्याणाचा मार्ग दाखवला. त्यामुळे बाबासाहेबांना अपेक्षित असलेली बुद्धा संस्कृती चळवळ अधिक जबाबदारींनी महिलांनी पुढे न्यावी त्यातच महिलांचा विकास आहे व हेच आपल्या देशाची सेवा आहे अश्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी पारडपार येथील धम्म चक्र परिवर्तन दिनानिमित्त आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच नीलिमा चौधरी ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे पोलीस पाटील लताताई रामटेके, ग्रामपंचायत सदस्य सुमन मोटघरे, बुद्ध पंचकमेटीचे अद्यक्स सुधाकर वाघमारे, काशिनाथ सूर्यवंशी, संजीव वाघमारे, गुलाब गेडाम, विनोद वाघमारे होते. या कार्यक्रमाचे संचालन गोपीचंद मोटघरे यांनी केले तर आभार विवेक मेश्राम यांनी मानले.
महिलांनी बाबासाहेबांना अपेक्षित असलेली बौद्ध सांस्कृतिक चळवळ अधिक जबाबदारीनी पुढे न्यावी- समतादूत प्रज्ञा राजूरवाडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 19, 2021
Rating:
