वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्याच्या दिवशीच कार्यकर्त्यांनी घेतला आमदार बंटी भांगडियांवर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश


सह्याद्री न्यूज | रामचंद्र कामडी
चिमूर, (१९ ऑक्टो.) : नेरी येथील दस्तलेखक तथा वंचितचे कार्यकर्ते चंदू मारोती गेडाम व सामाजिक कार्यकर्ता डॉ.सुप्रतिक कर्मपाल भैसारे यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांच्या कार्याचा झंझावात पाहून तसेच या पक्षात सर्वांना मिळत असणारी समान वागणूक बघुन त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये वंचित बहुजन आघाडीला धक्का देत प्रवेश घेतला.

आमदार भांगडिया यांनी या क्षेत्रात अनेक विकासात्मक कामे करून लोकप्रियता निर्माण केली तसेच गोरगरीब लोकांना त्यांच्या अडचणी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक यावर मात करण्यासाठी मदत करू त्यांचे जीवनमान उंचावले. विविध क्षेत्रात कार्य करण्याची त्यांची वेगळी शैली लोकांना मोहुन टाकणारी आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांंनी या पक्षात प्रवेश घेतलेला आहे. यावेळी आमदार भांगडिया यांनी दोघांचे दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.

कार्यक्रमाला डॉ. श्याम हटवादे (महाराष्ट्र प्रदेश सदस्य भाजपा कार्यकारिणी), राजू पाटील झाडे (तालुका अध्यक्ष भाजपा), माया ननावरे (तालुका अध्यक्ष महिला आघाडी), राजू पाटील झाडे, तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्याच्या दिवशीच कार्यकर्त्यांनी घेतला आमदार बंटी भांगडियांवर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्याच्या दिवशीच कार्यकर्त्यांनी घेतला आमदार बंटी भांगडियांवर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश Reviewed by सह्याद्री चौफेर on October 19, 2021 Rating: 5
Powered by Blogger.