सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे
वणी, (१९ ऑक्टो.) : अश्विन पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा म्हणून आनंदाने दरवर्षी साजरी करतात. अश्विन पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकर, माता पार्वती व भगवान गणेश या तिघांनीची मूर्ती असती, यालाच भूलोजी व भुलाबाई उत्सव म्हणतात.
भगवान शंकर व पार्वती हे दोघे सारीपाट खेळत होते, यात माता पार्वती जिंकल्या व भगवान शंकरजींना चिडवत होत्या, त्यांना राग आला म्हणून ते निघून गेले, मग पार्वतीने भिल्लरीचे रूप घेऊन भगवान शंकराकडे गेल्या व शंकर भगवान त्यांना पाहून सगळं विसरून गेले. त्यामुळे तेव्हा पासून भूलोनी अस म्हणतात. त्यानंतर भुलाबाई सुद्धा नाव पडले. अशी ही आख्यायिका आहे.
वणी शहरातील सपना शाम धनमने यांच्या घरी अनंत चतुरर्दशीच्या दुसऱ्या दिवशी भुलाबाई ची स्थापना करतात तसेच संपूर्ण संसारात लागणारे साहित्य ठेवण्यात आले आहे. कोजागिरीच्या दिवशी सायंकाळी भुलाबाई चे पूजन करून गाणे म्हणतात, यात महिला व मुली मोठ्या प्रमाणात सहभागी होतात, खेळ खेळतात व खाऊ ओळखले जातात. अश्या प्रकारे हा भुलाबाई व कोजागिरी चा उत्सव साजरा करण्यात येतो.
कोजागिरी पौर्णिमा भूलोजीच्या पूजेने करतात साजरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 19, 2021
Rating:
