वराेराच्या हेकेखाेर महिला तहसीलदार राेशन मकवानें विरुध्द विदर्भ पटवारी संघटना आंदोलन उभे करणार



सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (१९ ऑक्टो.) : शासकीय कामात चंद्रपूर जिल्ह्यात सदैव अग्रेसर असणां-या वराेरा उपविभागातील तलाठ्यांशी सुडबुध्दीने वागणां-या तसेच त्यांना मागिल महिण्यांचा पगार वेळेवर न देणां-या महिला तहसीलदार राेशन मकवाने यांचे विरुध्द पटवारी संघटना शाखा वराेराने आंदोलन उभे करण्यांची तयारी दर्शविली असुन तश्या आशयाचे एक पत्र चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे कडे नुकतेच दिले असल्याचे वृत्त आहे.

काेराेना सारख्या काळात दिवस रात्र एक करुन पटवा-यांनी प्रामाणिकपणे शासनाची कामे केली आहे. ही वस्तुस्थिती डाेळ्यांसमाेर असतांना देखिल शासकीय कामांसाठी या महिला तहसीलदारांनी काही तलाठ्यांना कारणे दाखवा नाेटीसा बजावून त्यांचे मनाेबल खच्ची करण्यांचा प्रयत्न केला आहे. वास्तविक पाहता काही तलाठी नव्याने तलाठी दप्तरला रुजू झाले आहे. आल्या क्षणीच त्यांचे कडुन कुठल्याही (शासन कामांची) कामाची १००टक्के अपेक्षा करणे याेग्य नाही. पटवारी हा महसुल विभागाचा एक प्रमुख कणा आहे. त्यांचेच कामावर तहसील कार्यालयाचे संपूर्ण भवितव्य अवलंबुन असते. वसुली सारखे महत्वाच्या कामाची जबाबदारी त्यांचे वर अवलंबुन असते, नैसर्गिक आपत्ती सारख्या कामात त्यांचे काम तितकेच माेलाचे व महत्वाचे ठरते.

शासकीय कामात हा तालूका जिल्ह्यात कधीच मागे पडला नाही. हा आजवरचा इतिहास आहे. वेळेवर व ऐन दसरा सणाच्या दिवसात तलाठ्यांना पगार न देणां-या या महिला तहसीलदार विरुध्द येत्या २५ तारखेंपासून आंदोलन उभे हाेत असून, या पहिल्याच दिवशी काळ्या फिती लावून तालुक्यातील पटवारी शासन व जनतेंचे काम करणार आहे. आंदाेलनाचे प्रत्येक टप्पे ठरविण्यात आले असून "या" महिला तहसीलदारांवर याेग्य कारवाई न झाल्यास नाेव्हेंबर महिण्यांच्या ८ तारखे पासून बेमूदत काम बंद आंदोलन पुकारण्यात येत असल्याचा इशारा प्रशासनाला एका लेखी निवेदनातुन दिला आहे.

दरम्यान, या आंदाेलनाने सदरहु तहसीलदार वर जर कारवाई झाली नाही तर जिल्हा पटवारी संघ या आंदाेलनात उतरण्यांची शक्यता नाकारता येत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात एका महिला तहसीलदार विरुध्द पटवारी संघटनेव्दारा आंदोलन हाेण्यांची ही पहिलीच वेळ आहे.
वराेराच्या हेकेखाेर महिला तहसीलदार राेशन मकवानें विरुध्द विदर्भ पटवारी संघटना आंदोलन उभे करणार वराेराच्या हेकेखाेर महिला तहसीलदार राेशन मकवानें विरुध्द विदर्भ पटवारी संघटना आंदोलन उभे करणार Reviewed by सह्याद्री चौफेर on October 19, 2021 Rating: 5
Powered by Blogger.