सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील पिसगाव येथीलएका गवंडी काम करणाऱ्या कामगारांने पहापळ रस्त्यालगत नाल्या नजिक गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली.
शंकर किसन आत्राम (वय ४२) रा. पिसगाव असे नाव असून आत्राम हे १५ ऑगस्ट रोजी पहाटेपासून घरातून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी शोध घेतला असता ते नाल्यालगत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीसपुढील तपास करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.


