टॉप बातम्या

गौराळा फाट्याजवळ भीषण अपघात


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मारेगाव-वणी राज्यमार्गावरील गौराळा फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने शुभम रवींद्र ठावरी (रा. आष्टी ता. वरोरा जि. चंद्रपूर) हा युवक गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याचा डावा हात दंडापासून अलग झाला.

शुभम मारेगाव येथील फायनान्सचे काम आटोपून दुचाकीने वणीच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. नागरिकांनी त्याला तातडीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर अवस्थेत पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

सदर घटनेची मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मारेगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();