टॉप बातम्या

अविनाशभाऊ लांबट यांच्या वाढदिवसानिमित्त १६ ऑगस्टला अभिष्टचिंतन सोहळा


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : भारतीय जनता पार्टीचे मारेगाव तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती, मारेगावचे संचालक मा. श्री. अविनाशभाऊ लांबट यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १२ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, मारेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

या अभिष्टचिंतन सोहळ्याचे उद्घाटन मा. श्री. हंसराज भैया अहिर, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अॅड. प्रभुलभाऊ चव्हाण, जिल्हाध्यक्ष, भाजपा यवतमाळ राहणार आहेत.
तर कार्यक्रमाला मा. श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब, आमदार, वणी विधानसभा क्षेत्र यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

अविनाशभाऊ लांबट यांनी मारेगाव तालुक्यात सामाजिक, राजकीय तसेच ग्रामविकासाच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेला त्यांचा सातत्यपूर्ण संपर्क यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत अविनाशभाऊ लांबट यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येणार आहेत. त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रपरिवार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
माणसं जोडणाऱ्या या नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();