सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्याचा संदेश देत वडगाव येथे 'जागतिक आदिवासी गौरव दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. बिरसा मुंडा विचार मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमात क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.
बिरसा मुंडा विचार मंचचे अध्यक्ष मा.ज्ञानेश्वर सालूरकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व झेंडावंदनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेत आदिवासी समाजाच्या हक्क व अधिकारांसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. निसर्ग, जल, जंगल आणि जमीन यांच्याशी आदिवासी समाजाचे असलेले नाते लक्षात घेता पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला स्टिंग ऑपरेशनचे ग्रामीण प्रतिनिधी, ए टी एस तालुका अध्यक्ष, आर टी आय कार्यकर्ते तथा शिवसेना विभाग प्रमुख नांदेपेरा लहानू सालूरकर, गंगाधर गेडाम सर, पोलीस पाटील श्री. विठ्ठल डाखरे, आनंदराव सालूरकर, जनार्दन परचाके, गोपाल बोरकर, संजय सालूरकर, भारत गेडाम, शंकर परचाके, बबलू सालूरकर, साहील किनाके, नामदेव गेडाम, पंढरी सालूरकर, नंदू सालूरकर, सारंग सालूरकर यांच्यासह महिला बचत गट व गावातील समाजबांधवांची उपस्थिती होती.
विश्व आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून आदिवासी समाजाची संस्कृती व अस्मिता जपण्यासोबतच निसर्गाचे संवर्धन आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.