टॉप बातम्या

जागतिक आदिवासी दिनानिमित्त घाटंजी येथे बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

घाटंजीआज ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त घाटंजी येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक संघर्ष, संस्कृती, परंपरा आणि हक्कांचे स्मरण करण्यात आले. धरती आबा बिरसा मुंडा यांच्या विचारांना अभिवादन करत आदिवासी समाजाच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमाला माननीय आमदार राजूभाऊ तोडसाम, जिल्हा महामंत्री रेखाताई कोठेकर मॅडम, विणकर ताई, वर्षा पेदोर, तालुका अध्यक्ष विजय बैस, रमेश धुर्वे, तसेच बाळू जाधव, संदीप माटे, पंकज ठाकरे, महेश जाधव, बंडू तोडसाम, अरविंद जाधव, गोपाल काळे, राऊत काका, राम खांडरे, अंकुश ठाकरे, प्रदीप ठोबरे, अमित महल्ले, अनुप अप्पनवार, नरेश पेदोर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमात आदिवासी समाजाची एकजूट, शिक्षण, सामाजिक विकास आणि हक्कांसाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();