सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील टाकरखेडा येथे युग साक्षी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गाव परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला युग साक्षी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय जीवने, सचिव करडे सर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक ज्ञानेश्वर चिकटे, विठ्ठल धानकी, प्रेशीत धानकी, आशा वर्कर गीता संजय जीवने, अंगणवाडी सेविका देवश्री धानकी, किरण लावे, जुमनाके मॅडम, अनिल कोडापे, मधुकर धानकी, प्रतीक धानकी व किशोर लावे यांची उपस्थिती होती.
वृक्षारोपणासोबतच लावण्यात आलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.