टॉप बातम्या

मच्छिन्द्रा येथे उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : गट ग्रामपंचायत मच्छिन्द्रा येथे शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी ठरलेल्या वेळेनुसार स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, आरोग्य विभागाचे, आशा वर्कर, अंगणवाडी बालक, ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर उपस्थित नागरिकांनी तिरंग्याला मानवंदना देऊन देशभक्तीचा जयघोष केला आणि एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी गावात उत्साहाचे व देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();