यंदाही, केळापूर तालुक्यात नवरात्री उत्सव व देवी विसर्जन शांततेत


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (१९ ऑक्टो.) : मागील दीड ते दोन वर्षाच्या कोरोनाच्या काळात नवरात्री उत्सव अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने साजरे करण्यात येत आहे. यंदा सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे.

मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यात यंदा कोरोना काळात अगदी साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव व देवी विसर्जन करण्याचे ठरवण्यात आले. शासन नियमांचे पालन करण्यात यावे अशा सूचना होत्या.
                       
याच अनुषंगाने पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तालुक्यात यंदा कोरोना काळात नवरात्रोत्सव हा शांतता व सुव्यवस्था कायम ठेऊन प्रत्येक गावात ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कोन्स्टेबल बिट जमादार राजू मोहूर्ले यांनी गोपालपूर बिट परिसरातील वांजरी, महांडोळी, चालबर्डी, बेलोरी, आकोली (बग्गी) कुंडी. बोरगाव (कडु) ताडउमरी तसेच वाय बीट या गावात विसर्जनाची उत्तम व महत्वाची कामगिरी बजावली. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महत्वपूर्ण नियोजन करून धुरा सांभाळत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. त्यांच्या अथक प्रयत्ननाने यंदाचा नवरात्री उत्सव व विसर्जन सोहळा अगदी शांततेत पार पडले. 
यंदाही, केळापूर तालुक्यात नवरात्री उत्सव व देवी विसर्जन शांततेत यंदाही, केळापूर तालुक्यात नवरात्री उत्सव व देवी विसर्जन शांततेत   Reviewed by सह्याद्री चौफेर on October 19, 2021 Rating: 5
Powered by Blogger.