आमदार नामदेवराव ससाने यांनी घेतला महामार्ग कामाचा आढावा


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
उमरखेड, (१९ ऑक्टो.) : आज मंगळवार रोजी उमरखेड महागाव विधानसभेचे मा. आमदार नामदेव ससाने यांनी आढावा बैठकी नंतर सुरू झालेल्या महामार्ग कामाचे व मार्लेगाव येथील पैनगंगा पुलाच्या कामाची आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि सदभाव कंपनी च्या व्यवस्थापकांना अजून गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

महागांव -उमरखेड हदगांव हायवे संदर्भाने व उमरखेड महागांव शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था होत असल्याने काही दिवसांपूर्वीच मा.आमदार नामदेव ससाने यांनी उमरखेड येथील शासकीय विश्राम गृहावर बोलविलेल्या मिंटीग मध्ये NHI चे सुनिल पाटील राष्ट्रीय महामार्ग प्रमुख, जगमोहन लोढी कार्यकारी अभियंता, राव साहेब प्रोजेक्ट मॅनेजर ह्यांचेसोबत महामार्ग कामाच्याप्रगतीचा आढावा घेतला होता. या NHI च्या बैठकी नंतर कामाने गती पकडली आहे.

 कामाच्या पाहणी प्रसंगी जिल्हा सचिव महेश काळेश्वरकर, पाणीपुरवठा सभापती दिलीपभाऊ सुरते, शिक्षण सभापती प्रकाश दुधेवार सर उपस्थित होते.
आमदार नामदेवराव ससाने यांनी घेतला महामार्ग कामाचा आढावा आमदार नामदेवराव ससाने यांनी घेतला महामार्ग कामाचा आढावा Reviewed by सह्याद्री चौफेर on October 19, 2021 Rating: 5
Powered by Blogger.