सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (५ ऑक्टो.) : महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं कला कुंजच्या सदस्या तथा गडचिरोली येथील मूळ रहिवाशी असलेल्या मनीषा मडावी यांचा नुकताच सन्मान करण्यांत आला . त्या एका आदिवासी सामान्य परिवातील सदस्या असून त्यांनी आपल्या ज्ञानाच्या व अफाट मेहनतीच्या जोरावर "मिसेस इंडियाचा" पुरस्कार प्राप्त करुन अतिदुर्गम आदिवासी गडचिराेली जिल्ह्याचे नांव लाैकिक केले आहे. या अगाेदर देखिल मनीषा मडावी यांनी मिसेस महाराष्ट्र पुरस्कार, टीव्ही रिऍलिटी शो (show) महाराष्ट्र सुपर माँडेल (पुरस्कार) आदीं पुरस्कार मिळविले आहे . त्यांच्या दैदीप्यमान यशाला प्रोत्साहन देण्यासाठी बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघचे विभागीय अध्यक्ष डॉ.नामदेव खाेब्रागडे यांनी मडावी यांच्या (गडचिराेली) निवासी जाऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांनी तिला भविष्याच्या यशस्वी वाटचालीसाठी भरभरुन शुभेच्छा व शुभकामना दिल्या. या वेळी श्रीनिवास कोडाप, कुमेंद्र मेश्राम, सागर आत्राम आदीं मंडळी उपस्थित होती.
"मिसेस इंडिया" पुरस्कार प्राप्त मनीषा मडावींचा सन्मान
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 05, 2021
Rating:
