टॉप बातम्या

बोरीमहाल येथे सोयाबिन च्या शेतात अजगर

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख
कळंब, (४ ऑक्टो.) : तालुक्यातील बोरीमहल येथे शेतात सोयाबिन कापणी सुरू असतांना भला मोठा ९ फूट लांबीचा अजगर दिसताच मजुरांची घाबरगुंडी उडाली, मंगेश रुईकर या शेतकऱ्याने वाईल्डलाईफ कंझर्वेशन अँड रिसर्च संस्थेचे रेस्क्युअर अब्दुल कलाम यांच्याशी फोन वरून संपर्क साधला, क्षणाचाही विलंब न करता सर्पमित्र अब्दुल कलाम आणि सय्यद तौसीफ व वैभव काळे या सर्पमित्रांनी शेतात पोहचून अजगरला सुरक्षित रित्या जेरबंद केले व मजुरांना सांपाविषयी जनजागृती करून आपल्या परिसरात कुठेही वन्यप्राणी दिसल्यास न मारता वन्यजीव रक्षकांना बोलविण्याचे आव्हान केले.

वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक एल. के. उपाध्ये यांच्या उपस्थितीत दुर्ग च्या जंगलात मुक्त करण्यात आले. त्या वेळी संस्थेचे रेस्क्युअर श्वेतल लांडगे, अक्षय मोहणापुरे, नदीम शेख उपस्थित होते.
Previous Post Next Post