सह्याद्री न्यूज | रुस्तम शेख
कळंब, (४ ऑक्टो.) : गेल्या काही दिवसांपासून कोविड च्या कारणांनी प्रलंबित आत्मा अध्यक्ष पदाची निवडणूक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात पार पडली. यामध्ये सर्व नवनियुक्त सदस्यांनी एकमुखाने संजय भाऊ दरणे यांची अध्यक्ष म्हणून अविरोध निवड केली. याप्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून तालुका कृषी अधिकारी एस. एस भगत तथा विष्णू गायकवाड बी. टी. एम.(आत्मा) यांनी सांभाळली.
यावेळी कृषी विभागाचे मयुर गोफने, महेंद्र ओंकार, प्रविण चंदनशिवे, शयाम कडपेवाड, मोकडे आदी उपस्थित होते.
शेतकरी सल्लागार समिती (आत्मा) कळंब च्या अध्यक्षपदी संजय भाऊ दरणे (हिवरा) यांची अविरोध निवड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 04, 2021
Rating:
