उपराजधानी नागपूरात थाटात पार पडला "लाेकमत एक्सलेंट अवॉर्ड" वितरण साेहळा - अनेक कर्तूत्वान शिक्षकांचा झाला सन्मान
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (५ ऑक्टो.) : उपराजधानी नागपूरातील हाँटेल सेंटर पाँईट येथे काल सोमवार दि.४ ऑक्टाेंबरला कर्तृत्वान शिक्षकांचा गाैरव समारंभ थाटात पार पडला. साेबतच टीचर बूकचे प्रकाशन देखिल करण्यात आले.
हा शानदार व नेत्रदिपक साेहळा लाेकमत, रायसाेनी तथा सुधिर ॲड स्मृती फाँऊडेशन वतीने आयोजित करण्यात आला हाेता. दरम्यान, या साेहळ्यात विदर्भातील ५२ कर्तूत्वान शिक्षकांची एक्सलेंट टिचर अवॉर्ड (२०२१) म्हणून निवड करण्यात आली हाेती. अश्या सर्व शिक्षकांना काल प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत गाैरविण्यात आले.
सदरहु आयाेजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्लाेबल टीचर प्राईज विजेता रणजित सिंह डिसले, सुप्रसिध्द अभिनेत्री निशीगंधा वाड व विधान परिषद आमदार अभिजीत वंजारी लाभले हाेते. दरम्यान याच कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या उच्चशिक्षित तथा अनेक पुरस्कार प्राप्त शिक्षिका सुशीला पुरेड्डीवार यांना देखील या वेळी हा (एक्सलेंट टीचर अवॉर्ड) रस्कार देवून सन्मानित करण्यात आले हाेते. शालेय शिक्षणा साेबतच त्यांना साहित्य क्षेत्रात विशेष रुची आहे.
या पूर्वी देखील त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे सुशीला पुरेड्डीवार ह्या चंद्रपूर-गडचिराेली या जुळ्या जिल्ह्यातील सहजं सुचलं काव्यकुंजच्या एक जेष्ठ सदस्या आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मुख्य मार्गदर्शिका मेघा धाेटे, मायाताई काेसरे, प्रभा अगडे, सिमा पाटील, संयाेजिका सुविद्या बांबाेडे, सराेज हिवरे, सारीका खाेब्रागडे, उज्वला यामावार, यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
उपराजधानी नागपूरात थाटात पार पडला "लाेकमत एक्सलेंट अवॉर्ड" वितरण साेहळा - अनेक कर्तूत्वान शिक्षकांचा झाला सन्मान
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 05, 2021
Rating:
