स्वरांगण संगीत विद्यालय मारेगाव येथे संगीत प्रेमिंना सुवर्ण संधी


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (४ ऑक्टो.) : रवि घुमे सर द्वारा संचालित स्वरांगण संगीत विद्यालय मारेगाव येथे श्री शंकरराव वैरागकर यांचे शिष्य श्री अविनाशजी कन्नाके (गुरुजी) यांचा पहिला संगीत क्लास यशस्वी पार पडला असून, उपस्थित असणाऱ्या सर्व संगीत प्रेमीना विशेष अनुभव आला. यावेळी त्यांच्याकडे संगीत शिकणाऱ्यांचे भविष्य उज्वल आहे असा अनुभव उपस्थितांना आला. तशी प्रतिक्रिया उपस्थितांनी दर्शविली. आजच्या उदघाट्न प्रसंगी सह्याद्री न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक श्री कुमार अमोल, लॅब असिस्टंट तथा उत्कृष्ट तबला वादक आकाश कुमरे यांची उपस्थिती विशेष लाभली. आयोजकांच्या वतीने व विद्यार्थ्यांच्या वतीने मान्यवरांचे आभार मानले. यावेळी रवि घुमे द्वारा संचालित स्वरांगण संगीत विद्यालयाचे संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीस सह्याद्री न्यूज परिवारातर्फे तर्फे खूप खूप शुभेच्छा...!!

परिसरातील संगीत प्रेमिनी स्वरांगण संगीत विद्यालय मारेगाव येथील रवि घुमे यांच्या राहते घरी गायन व तबला वादक क्लासेसची प्रक्रिया सुरु असून, इच्छुकांनी आपला प्रवेश घेऊन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. स्वरांगण संगीत विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष रवि घुमे सर यांनी केले.
स्वरांगण संगीत विद्यालय मारेगाव येथे संगीत प्रेमिंना सुवर्ण संधी स्वरांगण संगीत विद्यालय मारेगाव येथे संगीत प्रेमिंना सुवर्ण संधी Reviewed by सह्याद्री चौफेर on October 04, 2021 Rating: 5
Powered by Blogger.