इनरव्हिल क्लब ऑफ वरोरा ने घेतला "मानसिक दृष्ट्या विशेष दिव्यांग आणि सामान्य मुलांसाठी " दिवाळीच्या दिव्यांचे " डेकोरेशन व पेंटिंग "चा वर्कशॉप"

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (४ औक्ट.) : या करोनाकाळात प्रत्येक गोष्ट ऑनलाईन वर सुरू आहे, शाळा पण ऑनलाइन त्यामुळे मुले बालपणातील खेळण्याचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडत नाहिये.
             
म्हणून " जिओ जिंदगी " प्रोजेक्ट अंतर्गत आमच्या क्लब च्या C.C. झेनब सिद्दीकोट यांनी चंद्रपूर च्या राखी बोराडे यांच्या मदतीने दिवाळीच्या दिव्यांचे डेकोरेशन व पेंटिंग करिता वरोरा येथील गांधी उद्यान येथे दि. ३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ ते ११ या दरम्यान कार्यशाळा आयोजित केली.
              
यात २६ मानसिक दृष्ट्या दुर्बल व अन्य सामान्य २०० च्या वर मुलांनी सहभाग घेऊन याचा आनंद घेतला. यासाठी लागणारे सर्व साहित्य क्लब तर्फे उपलब्ध करून देण्यात आले.
                 
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी क्लब च्या अध्यक्षा मधू जाजू, सेक्रेटरी वंदना बोढे, C.C. झेनब सिद्दीकोट, स्नेहल पत्तीवार, सुचेता पद्ममावार, दिपा माटे, आभा सायरे, दिपाली टिपले, संध्या बारई, पूजा गोठी, प्रणाली बेदरकर, प्राजक्ता कोहळे, हर्षदा कोहळे व अन्य सदस्या उपस्थित होत्या.
इनरव्हिल क्लब ऑफ वरोरा ने घेतला "मानसिक दृष्ट्या विशेष दिव्यांग आणि सामान्य मुलांसाठी " दिवाळीच्या दिव्यांचे " डेकोरेशन व पेंटिंग "चा वर्कशॉप" इनरव्हिल क्लब ऑफ वरोरा ने घेतला "मानसिक दृष्ट्या विशेष दिव्यांग आणि सामान्य मुलांसाठी " दिवाळीच्या दिव्यांचे " डेकोरेशन व पेंटिंग "चा वर्कशॉप" Reviewed by सह्याद्री चौफेर on October 04, 2021 Rating: 5
Powered by Blogger.