चंद्रपूरात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने "महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी वैद्यकीय सहाय्यता कक्षा"बाबत - एक मार्गदर्शन शिबिर संपन्न

 - अनेकांची उपस्थिती !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (४ ऑक्टो.) : चंद्रपुरातील जनता महाविद्यालयाच्या सभागृहात चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काल (रविवारी) "महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी वैद्यकीय सहायता कक्ष" तर्फे जिल्ह्यातील आर्थिक दृष्ट्या कमजोर व गरजू रुग्णांवर वैद्यकीय उपचार शासनाच्या विविध योजनांमधून कसे विनामूल्य करून देता येते याबाबत मार्गदर्शन शिबिर या वैद्यकीय सहायता कक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख गजानन साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच विधानसभेचे माजी उपाध्यक्ष .मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,शहर अध्यक्ष राजीव कक्कड,महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके,शहर महिला अध्यक्ष ज्योतीताई रंगारी,सेवादलाचे जिल्हाध्यक्ष .महादेवराव पिदुरकर,युवक शहरचे अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी,युवतीच्या माजी शहर अध्यक्ष प्रज्ञा पाटील,सुधाकर कातकर यांच्या उपस्थित संपन्न झाले.
   विविध प्रकारच्या आजारांवर चंद्रपूर जिल्ह्यातील त्याचप्रमाणे नागपूर,वर्धा,व राज्यातील कोणकोणत्या दवाखान्यांमध्ये शासनाच्या विविध योजना,ज्यात 'महात्मा फुले जन आरोग्य योजना', 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजना', लहान बालकांच्या दुर्धर आजारांवर उपचारासाठी असलेली योजना,त्याचप्रमाणे विविध समाजसेवी संस्था,ज्यात सिद्धी विनायक मंदिर ट्रस्ट,शिर्डी संस्थान ट्रस्ट, टाटा ट्रस्ट इत्यादी तर्फे आर्थिक मदत मिळण्या बाबतची माहिती,तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळण्यासाठी करावयाचा अर्जबाबत माहिती, अश्या या सर्व योजनांची माहिती,त्यांच्या कडून आर्थिक मदत कशी मिळवायची,त्यासाठी कोणकोणती प्रक्रिया पूर्ण करायची यावर विस्तृत मार्गदर्शन MJPJAY, PMJAY योजनेचे प्रमुख डॉ.सुमित भगत, धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी मडावी आणि महाराष्ट्रातील दानशूर असलेल्या विविध समाजसेवी संस्था याबद्दलची संपूर्ण माहिती प्रोजेक्टरच्या माध्यमांतून "महाराष्ट्र राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख गजानन साबळे" यांनी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यांतून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना या वेळी समजावून देण्यांत आली.येत्या १० दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात "वैद्यकीय सहायता कक्षाची चमू निवडण्यात येईल" व त्यांच्या माध्यमांतून तालुक्यातील अश्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना विनामूल्य उपचार मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे हे वैद्यकीय आरोग्य पथक स्थापन करण्यात येईल अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी या वेळी बाेलतांना दिली.आपल्या अध्यक्षीय भाषणात मोरेश्वर टेमुर्डे यांनी राष्ट्रवादी पक्षाने सुरू केलेल्या या नाविण्यपूर्ण समाजसेवेच्या कार्याबद्दल पक्षाचे आभार व्यक्त केले.व कार्यकर्त्यांना या विषयाला गांभीर्याने घेवून गरजुंच्या मदतीसाठी धावून जाण्याचे आवाहन केले.उपराेक्त गंभीर व अतिशय महत्त्वपूर्ण विषयावरील मार्गदर्शन शिबिरास जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन चंद्रपूर शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांनी केलेे.
चंद्रपूरात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने "महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी वैद्यकीय सहाय्यता कक्षा"बाबत - एक मार्गदर्शन शिबिर संपन्न चंद्रपूरात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने "महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी वैद्यकीय सहाय्यता कक्षा"बाबत - एक मार्गदर्शन शिबिर संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on October 04, 2021 Rating: 5
Powered by Blogger.